Bigg Boss Marathi 5 चे पर्व सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या घरातील स्पर्धकांमध्ये होणाऱ्या भांडणाबद्दल, टास्कबद्दल आणि स्पर्धकांच्या वागण्यावर प्रेक्षकांसह कलाकार, आधीच्या पर्वातील सदस्य सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. आता बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक सोनाली पाटीलने एका मुलाखतीदरम्यान धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकरच्या खेळावर वक्तव्य केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाली सोनाली पाटील?

सोनाली पाटीलने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत धनंजय पोवारच्या खेळाबद्दल बोलताना तिने म्हटले, “डीपीदादाने अजून चांगला गेम खेळला पाहिजे, त्याच्यात ती क्षमता आहे, ती अजून त्याने दाखवलेली नाही. जे तो खेळतोय किंवा हसवण्याचा प्रयत्न करतोय, हा भावनांचा खेळ आहे. फक्त गेम, टास्कपुरताच मर्यादित नाही. बऱ्याच गोष्टी असतात. तिथे तो चांगलं वातावरण तयार करतोय, हा त्याचा स्वभावच आहे. मात्र, अजून तो दिसण्याची गरज आहे, तो तसा दिसला की खूप छान पद्धतीने पुढे जाईल.”

अंकिताच्या खेळाबद्दल बोलताना सोनाली पाटीलने म्हटले, “जेव्हा जेव्हा डीपीदादा बोलतो, तेव्हा ती त्याला शांत करते. मला भयंकर राग आलेली गोष्ट म्हणजे अंकिताने न विचार करता डीपीदादाला नॉमिनेट केले. मला कळलंच नाही, एवढं तू राजकारण कसं खेळू शकतेस. कारण द्या असं जेव्हा बिग बॉसने म्हटलं, तेव्हा डीपीदादाबद्दल तिने सांगितलं की, त्यांचा गेम कुठेतरी कमी पडलाय आणि तो त्यांनी सुधारायला पाहिजे. मला असं वाटतं, डीपीदादाइतका पाठिंबा तुला त्या घरात कोणीच दिला नाही. डीपीदादा घराच्या बाहेर असल्यापासून तू त्यांना ओळखते. घरात गेल्यानंतरसुद्धा त्यांचं काही खटकलं आहे, असंही काही झालं नाही. अशा गोष्टी असतानादेखील तू त्यांना नॉमिनेशनमध्ये टाकणं पाठीत खंजीर खुपसल्यासारखं आहे. तू जर डीपीदादाबरोबर राजकारण खेळत असशील तर मला तुझा गेम आवडत नाही.”

हेही वाचा: Quiz : छोट्या पडद्यावर वादग्रस्त ठरणाऱ्या Bigg Boss Marathi शोबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न

पुढे बोलताना सोनाली म्हणते, “जेव्हा अभिजीतदादा बी टीमचा भाग म्हणून अंकिताला विचारायला जातो, तर तू अरबाजजवळ जाऊन परत अभिजीत दादाबद्दल बोलते. अंकिताच्या या सगळ्या गोष्टी मला आवडल्या नाहीत. ती जशी स्पष्टपणे बोलते, तसे तिने तिच्या ग्रुपबरोबर प्रामाणिक राहिले पाहिजे. आपला माणूस कितीही माती खाऊ दे, निदान पुढच्या टीममधील व्यक्तीला जाऊन सांगू नको”, असे म्हणत सोनालीने अंकिताच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सोनाली पाटील सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबद्दल वेळोवेळी आपले मत मांडत असल्याचे दिसते.