Jahnavi Killekar Husband Kiran Killekar: मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg boss marathi 5) पर्वात स्पर्धक म्हणून दिसत आहे. या शोमध्ये तिची अनेकांबरोबर भांडणं पाहायला मिळाली. वर्षा उसगांवकर यांचा अपमान केल्याने तिच्यावर टीका झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिने पंढरीनाथ कांबळेला बोलताना मर्यादा ओलांडली होती, त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करून जान्हवीची कानउघडणी केली होती. जान्हवीने शोमध्ये पंढरीनाथची माफी मागितली होती, तरी तिला तुरुंगात राहण्याची शिक्षाही देण्यात आली होती. हा शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनीही तिला खूप ट्रोल केलं. फक्त जान्हवीच नाही तर तिच्या कुटुंबालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. जान्हवीच्या पतीने त्याला वाईट शब्दात लोक ट्रोल करत असल्याचं म्हटलं आहे.

Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

जान्हवी किल्लेकरच्या पतीचे नाव किरण किल्लेकर आहे. तो जान्हवीच्या खेळाबद्दल अनेकदा पोस्ट करत असतो. जान्हवी व किरण यांना एक मुलगा आहे. जान्हवीच्या बिग बॉसच्या घरातील वर्तणुकीनंतर बाहेर तिच्या कुटुंबालाही ट्रोल केलं जातं. आता किरण किल्लेकरने लोक त्याला दिसण्यावरून ट्रोल करत असल्याचं म्हटलं आहे.

Bigg Boss Marathi: “तुम्हाला समजत नाहीये?”, अरबाज पटेलवर भडकला रितेश देशमुख; स्पर्धकांना विचारला ‘तो’ प्रश्न अन्… पाहा Video

“माझ्या दिसण्यावरून लोकांनी मला किती ट्रोल केलंय. अगदीच माकड आहे, इडलीवाला आहे, सरकारी नोकरीवाला आहे, बिझनेसमन आहे डुक्कर आहे असे शब्द वापरतात. मला माझे मित्र अशा रील्स पाठवतात आणि बोलतात अरे किरण तू तक्रार का करत नाहीस? मी म्हटलं त्या लोकांना काय करायचं ते करूदे. कारण आपण किती तक्रारी करणार. एक करणार, दोन करणार तीन करणार, किती तक्रारी करतात. मी आता सोशल मीडियावर सक्रिय झालो आहे. सोशल मीडियावर कितीतरी ग्रुप्स आहेत, मोठ्या मोठ्या ग्रुपवर मी शोधत असतो की कोण काय बोलतंय? जिकडे बघावं तिकडे जान्हवी, जिकडे बघावं तिकडे जान्हवी. मला या गोष्टीचा आनंद आहे की एवढे लोक माझ्या जान्हवीबद्दल की एवढे लोक तिला ट्रोल करत आहेत. तिच्याबरोबर मलाही ट्रोल करत आहेत,” असं किरण किल्लेकर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

जान्हवी किल्लेकर, तिचा पती किरण किल्लेकर व मुलागा इशान (फोटो – इन्स्टाग्राम)

Bigg Boss Marathi: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची नवीन पोस्ट; म्हणाली, “तो आणि निक्की…”

जान्हवी चुकते त्यानंतर तिला ट्रोल करणं यात गैर नाही पण त्यासाठी जी भाषा वापरते ती अत्यंत वाईट असते. जान्हवीमुळे किल्लेकर कुटुंबातील सदस्यांनाही ट्रोल केलं जातं, असंही किरण म्हणाला. या मुलाखतीत त्याने जान्हवी खूप संघर्ष करून इथवर पोहोचली आहे असंही सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 jahnavi killekar husband kiran killekar talks about trolling hrc