Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील तिसरा आठवडा पूर्ण झाला असून, आता या सीझनने चौथ्या पर्वात पदार्पण केले आहे. आता या आठवड्याची सुरुवात मोठ्या कल्ल्यानेच होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला बिग बॉसचा आवाज येत आहे. त्यावेळी, आज सत्याचा पंचनामा होणार आहे. खोलीत एका खुर्चीवर एका वेळी एक सदस्य जाऊन बसतो आणि त्याच्याविषयी बिग बॉस मत व्यक्त करतात. प्रोमोमध्ये दिसत असल्याप्रमाणे त्या विधानाशी इतर सदस्य सहमत आहेत की नाही, हे त्यांनी सांगायचे आहे.

बिग बॉसच्या घरात होणार सत्याचा पंचनामा

सुरुवातीला जान्हवी किल्लेकर त्या खोलीत जाऊन बसल्याचे दिसत आहे. जान्हवी किल्लेकरविषयी बिग बॉस म्हणतात, “तुम्ही निक्की तांबोळीची सावली आहात. तुम्हाला स्वत:चे असे अस्तित्व नाही.” त्यावर अंकिता वालावलकर आपल्या टीमच्या वतीने आम्ही त्या मताशी सहमत असून, समोर असलेला बझर वाजवताना दिसते. त्यानंतर निक्की तांबोळी ती बालिश बुद्धी आहे, असे कोणत्या तरी सदस्याबद्दल बोलताना दिसत आहे. सदस्यांमध्ये भांडण सुरू झाल्याचेदेखील पाहायला मिळते. प्रोमोच्या शेवटी जान्हवी किल्लेकर बझरवर हट, असे म्हणत जोरात हात मारत असल्याचे दिसत आहे. सदस्यांमध्ये भांडण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

आता प्रोमो पाहिल्यानंतर कोणत्या सदस्याविषयी कोणते सत्य बाहेर पडणार, कोणत्या सदस्याला ते म्हणणे पटणार आणि कोणता सदस्य त्याला विरोध करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व विविध कारणांमुळे गाजताना दिसत आहे. घरात पहिल्या दिवसापासून होणाऱ्या भांडण आणि वाद यामुळेदेखील हे पर्व चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: “आपल्या समाजात जातीयवाद…”; ‘स्त्री २’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “एकाच विहिरीतून पाणी पिण्याची…”

तिसऱ्या आठवड्यात घरातील दोन सदस्यांनी निरोप घेतला. निखिल दामले आणि योगिता चव्हाण हे स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. आता पुढे या खेळात आणखी काय होणार, घरातील समीकऱणे कशी बदलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच या आठवड्यात कोणते सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट होणार, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 janhvi killekar burst anger new promo watch video nsp