Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची विविध कारणांमुळे चर्चा रंगताना दिसते. स्पर्धकांमध्ये होणारी भांडणे, वाद-विवाद यांबरोबरच बिग बॉसच्या घरात अनेक गमती-जमती घडताना पाहायला मिळतात. आता बिग बॉस मराठीच्या घरात ‘नवरा माझा नवसाचा २’ची टीम आली आहे आणि त्यांच्या उपस्थितीत स्पर्धकांना एक टास्क दिला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बिग बॉसच्या घरात रंगला चुरशीचा खेळ
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये घरात दोन टीम करण्यात आल्या आहेत. टीम ए आणि टीम बी अशी या गटांची नावे आहेत. या दोन्ही टीमना आपापल्या बोर्डवर चित्रपटांची नावे पूर्ण करणारी कार्डे क्रमाने लावायची आहेत. त्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरस पाहायला मिळत आहे. स्वप्नील जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसत आहे. ‘अशीही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, अशा अनेक चित्रपटांची नावे स्पर्धकांनी बोर्डवर लावल्याचे दिसत आहे. प्रोमोच्या शेवटी कोणत्या टीमने आधी हा टास्क पूर्ण केला यावरून बोलणे सुरू असून, दोन्ही टीम आधी आम्ही शेवटचा शब्द लावला होता, असे म्हणताना दिसत आहेत. नीलेश साबळेने एकाच वेळी दोघांनी शेवटचा शब्द लावला, असे म्हणताच, दोन्ही टीम नाही म्हणताना दिसत आहेत. नीलेश साबळे आपण चेक करूयात, असे म्हणताना दिसत आहे. आता या खेळात कोण जिंकणार हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घचेर अनेकविध गोष्टींमुळे चर्चेत आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या संग्राम चौगुलेला वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर पडावे लागले आहे. त्याबरोबरच वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी व अरबाज पटेल हे सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण हे सदस्य सुरक्षित झाले असून, निक्की आणि अरबाज ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची घोषणा बिग बॉसने केली आहे. त्यानंतर निक्की तांबोळी मोठ्याने रडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या दोघांपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा: अमिताभ बच्चन यांनी रजनीकांत यांची ३३ वर्षांपूर्वीची सांगितली आठवण, म्हणाले, “तो जमिनीवर झोपायचा…”
आता बिग बॉस मराठीच्या घरात यापुढे कसा खेळ रंगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.