Bigg Boss चा खेळ असा आहे, जो कधी बदलेल सांगता येत नाही. कधी कोणाची मैत्री होईल आणि कधी कोणत्या सदस्यांमध्ये शत्रूत्व निर्माण होईल हे कोणीही सांगू शकत नाही. याबरोबरच बिग बॉसच्या घरात कोणता सदस्य कधी कोणाला धोका देईल आणि कधी कोणाच्या मदतीला धावून येईल याचेदेखील कोणी ठोकताळे मांडू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील चित्र असेच काहीसे पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला असून, सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये बिग बॉस निक्की आणि अभिजीतला जोडीमध्ये बांधले गेले आहात, असे म्हणताना दिसत आहेत.

निक्की आणि अभिजीतची जोडी, बंद करणार का सगळ्यांची बोलती?

प्रोमोच्या सुरुवातीला, निक्की आणि अभिजीत सोफ्यावर बसलेले असून ते एकमेकांशी गप्पा मारत आहेत. बिग बॉसचा अचानक आवाज येतो, “अभिजीत आणि निक्की तुम्ही जोडीमध्ये बांधलेले आहात. या परिस्थितीत तुम्हाला कोणते गाणे सुचत आहे.” त्यावर अभिजीत ‘हम दोनो दो प्रेमी..’ हे गाणे गात असल्याचे पाहायला मिळते. निक्की त्यावर हसताना दिसत आहे. त्यानंतर अंकिता वालावलकर म्हणते, “आज कळलं आम्हाला की जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात.” त्यावर अभिजीत आणि निक्की ‘कुछ तो लोग कहेंगे’ हे गाणे म्हणताना दिसत आहे. निक्की आणि अभिजीत एकमेकांबरोबर मजा करताना दिसत आहेत.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने, “निक्की आणि अभिजीतची जोडी, बंद करणार का सगळ्यांची बोलती?” अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: Video : “घरात पाळणा हलूदे..”, अक्षराला मातृत्वावरून प्रश्न विचारणाऱ्या बायकांना चारुलताचं स्पष्ट उत्तर; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो…

हा प्रोमो पाहिल्यानंतर बिग बॉसने घरातील सदस्यांना नवीन टास्क दिल्यासारखे वाटत आहे. आता हा नक्की काय टास्क असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, चौथ्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांची एकमेकांबरोबरची समीकरणे बदलली आहेत. आता या आठवड्यात घरात कोणती नवी समीकरणे तयार होणार आणि कोणता नवा कल्ला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे. याबरोबरच, चौथ्या आठवड्यात इरिनाला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले आहे, तर जान्हवी किल्लेकरला घरातील तुरुंगात राहण्याची शिक्षा मिळाली आहे.