Bigg Boss Marathi 5चे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या घरातील सदस्य विविध कारणांमुळे हे मोठ्या चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात कॅप्टन पदासाठी टास्क सुरू असून याचा एक व्हि़डीओ कलर्स मराठीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअऱ केला आहे. ज्यामध्ये निक्की तांबोळी आणि योगिता चव्हाण एकमेकींशी चांगलीच लढत दिसत आहेत.
योगिता चव्हाण आणि निक्की तांबोळी एकमेकींना भिडल्या
‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगिता चव्हाण आणि निक्की तांबोळी एकमेकींना भिडल्या असल्याचे दिसत आहे. योगिता चव्हाणला खेळातून बाहेर काढण्यासाठी निक्की तिच्याबरोबर ओढताना दिसत आहे. यादरम्यान बाल्कनीत उभे असलेले इतर सदस्य योगिता चव्हाणला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. शेवटी, आज वाघिणीने त्यांना ठार केले आहे, असे म्हणाताना आर्याचा आवाज ऐकायला मिळत आहे. आता बिग बॉसचा हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
बिग बॉसच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. सुरुवातीला या टास्कसाठी दोन टीम करण्यात आल्या होत्या. टीम ए आणि टीम बी असे गट करण्यात आले होते. यामध्ये टीम ए ही टास्क जिंकली. त्यानंतर या टीममधील सदस्य कॅप्टन्सीसाठी पात्र ठरले आहेत. या टीममध्ये योगिता चव्हाण, निक्की तांबोळी, घन:श्याम दरेकर, सूरज चव्हाण, अरबाज पटेल, निखिल दामले हे सदस्य या स्पर्धेत होते.
बिग बॉसने सदस्यांना एक टास्क दिला आहे, जो जिंकल्यावर त्यांना कॅप्टन पदापर्यंत पोहचता येणार आहे. प्रत्येक सदस्याला बी टीमकडून दिलेल्या क्रमाने फ्रेंच फ्राइस दिले गेले आहेत. आता इतर सदस्यांना इतरांचे फ्रेंच फ्राइस तोडण्याची मुभा आहे.
हेही वाचा: “एक दिवस असा येईल…”, राजेश खन्नांनी अमिताभ बच्चन यांचा अपमान केल्यावर जया बच्चन यांनी केलेलं भाकीत
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नक्की हा टास्क कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. घराची पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर ही झाली होती. आता घराचा दुसरा कॅप्टन होणार हे पाहणे, उत्सुकतेचे ठरणार आहे. याबरोबरच, रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर या आठवड्याच्या शेवटी कोणत्या सदस्याची शाळा घेणार आणि कोणत्या सदस्याचे कौतुक करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.