Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वातील हा पाचवा आठवडा सुरू असून या आठवड्यात कोणता कल्ला होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या घरातील एक नवीन व्हिडीओ प्रेक्षकांसमोर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये घन:श्यामला मानकाप्याच्या गुहेत बोलवले असल्याचे पाहायला मिळते.
मानकाप्याच्या गुहेत घन:श्यामची एन्ट्री
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला बिग बॉस घोषणा करतात, मानकाप्याच्या गुहेत जाणारे पुढील सदस्य घन:श्याम आहेत. त्यानंतर घन: श्याम एका रुममध्ये जात असल्याचे दिसते. तो गुहेत गेल्यानंतर त्याला बिग बॉस सूचना देतात, चौकोनात उभे राहा. त्यानंतर घन:श्याम एके ठिकाणी उभा राहतो. त्यानंतर बिग बॉस त्याला म्हणतात, पिवळ्या चौकोनात उभे राहा. तो त्या पिवळ्या चौकोनात उभा राहतो. त्यावर बिग बॉस म्हणतात, आपल्या समोर जी भिंत आहे, त्याकडे पाठ करुन उभे राहा. घन:श्याम सूचनेप्रमाणे उभा राहतो. त्यावर बिग बॉस त्याला म्हणतात की, मी तुम्हाला मान वळवायला सांगितले का? त्यावर घन:श्याम गोंधळलेला दिसत आहे.
याआधी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने मानकाप्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये घरातील सदस्य घाबरलेले दिसत होते.
दरम्यान, बिग बॉसच्या घरातील सदस्यांची समीकरणे चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्का एपिसोडनंतर बदललेली पाहायला मिळत आहेत. घरात जे पहिल्याच आठवड्यात दोन गट पडले होते. त्यातील टीम एमध्ये फूट पडली असून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीला तिच्याच ग्रृपमधील सदस्य तिच्या पाठीमागे काय बोलतात, याचे व्हिडीओ दाखवण्यात आले होते. ते पाहिल्यानंतर टीम एमधील कोणत्याही सदस्याला ट्रॉफी उचलू देणार नाही, असे वक्तव्य निक्की तांबोळीने केले होते. आता टीम ए आणि निक्की यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू असल्याचे दिसत आहे.
आता या आठवड्यात घरात आणखी कोणता कल्ला पाहायला मिळणार, याची उत्सुकता नेटकऱ्यांना लागली असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याबरोबरच, या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे असणार आहे. महत्वाचे म्हणजे, या आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर कोणत्या सदस्याची शाळा घेतली जाणार आणि कोणत्या सदस्याला रितेश देशमुखकडून शाबासकीची थाप मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.