‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss) च्या पाचव्या पर्वाला आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. आता तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे ही सुरुवात भांडणाने झाली आहे. कलर्स मराठी वाहिनीने एक प्रोमो प्रदर्शित केला असून यामध्ये निक्कीचे घरातील इतर सदस्यांबरोबर भांडण होत असल्याचे दिसत आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी तिच्या वस्तूंना हात लावला म्हणून पंढरीनाथ कांबळेबरोबर मोठ्या आवाजात भांडत आहे. या प्रोमोमध्ये धनंजय पोवार आणि घराची कॅप्टन अंकित वालावलकर यांच्याशीदेखील ती भांडताना दिसत आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Akshaya Deodhar and Hardeek Joshi
राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ

निक्कीने इतरांचे कपडे फेकत घातला वाद

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, निक्की तांबोळी पंढरीनाथ कांबळेला ओरडून विचारते की, माझ्या वस्तूंना हात का लावला? त्यावर पंढरीनाथदेखील माझी ड्युटी तिकडे आहे, असे म्हणतो. त्यावर निक्की म्हणते, ड्युटी करायची, काम करायचं समजलं ना? तिला उत्तर देताना पंढरीनाथ म्हणतो की, कारण तू तुझी ड्युटी करत नव्हतीस.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

त्यानंतर घरामध्ये धनंजय पोवार नक्की तांबोळीला म्हणत आहे, तू माझ्या कपड्यांना लाथ मारलीस. निक्की इतरांचे कपडे फेकताना दिसत आहे. यावेळी अंकिता म्हणते की, तुझ्या आवाजाला सगळ्यांनी घाबरुन राहायचं काय? तिला निक्की म्हणते की, हो, घाबरशील तू, घाबरशील. त्यानंतर निक्की बेडवरचे कपडे उचलत असते, तेवढ्यात तिला बाजूला करुन अंकिता त्या बेडवर येऊन बसते. मला धक्का मारायचा नाही असे म्हणत निक्की अंकिताला धक्का मारताना दिसत आहे.

हेही वाचा: तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “निक्कीच्या कल्ल्याने झाली आठवड्याची सुरुवात, कपड्यांची फेकाफेकी आणि कॅप्टन बरोबर धक्काबुक्की” असे कॅप्शन दिले आहे. आता हे भांडण ‘बिग बॉस’च्या घरातील कोणती समीकरणं बदलणार आणि याचे काय परिणाम होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.

दरम्यान, नुकताच ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, अरबाज पटेल या स्पर्धकांची कानउघडणी केल्याचे पाहायला मिळाले. तर ‘खेल खेल में’ चित्रपटानिमित्त अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि इतर टीमनेदेखील भाऊचा धक्का एपिसोडमध्ये हजेरी लावत धमाल केल्याचे पाहायला मिळाले.

आता तिसऱ्या आठवड्याची सुरुवातच भांडणाने झाल्याने या आठवड्यात आणखी घडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Story img Loader