Bigg Boss Marathi 5 व्या पर्वात सतत काहीतरी घडताना दिसते. आता घरात नुकताच टास्क पार पडला. या टास्कमध्ये दोन टीम करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जी टीम जास्तीत जास्त वेळा शिकाऱ्याची बंदूक मिळवेल, ती टीम यशस्वी होणार, असे या टास्कचे स्वरूप होते. टास्कच्या नियमानुसार जी टीम अयशस्वी ठरली, त्या टीममधले सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या टास्कनंतर निक्की सूरजला समजावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सूरज आणि निक्की किचनमध्ये आहेत. टास्कनंतर नाराज झालेल्या सूरजला निक्की समजावताना म्हणते, “तू चांगला खेळला आहेस. आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. तू असं वाईट वाटून घेऊ नको. तू पळालास, त्याला खेचलंससुद्धा. त्यामुळे हरकत नाही. आपण नाही तर ते कोणीतरी नॉमिनेट होणारच होतं. आपण झालो; आता काय करू शकतो त्याला.” निक्कीच्या या बोलण्यावर सूरज “हो” म्हणताना दिसत आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”

दुसरीकडे संग्राम चौगुले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे व अभिजीत सावंत एकत्र बसले आहेत आणि झालेल्या टास्कनंतर त्यांच्यात अरबाजबद्दल चर्चा सुरू आहे. पंढरीनाथ म्हणतो, “अरबाजचा अतिआत्मविश्वास त्याला कायम नडतो. त्याला वाटतं की, माझ्याकडे कोण येईल? उतू नका.” संग्राम म्हणतो, “अरबाज निक्कीचं कशाला ऐकतोय? वेडा आहे तो. त्याला स्वत:चं मतच नाही.” पंढरीनाथ म्हणतो, “निक्की त्याला घेऊन बुडणार आहे, मी एवढं सांगतो.” त्यावर अंकिता आणि अभिजीत सहमती दर्शविताना दिसत आहेत.

इन्स्टाग्राम

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी?

निक्की सूरजला समजावत असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “ही नॉमिनेट झाली आहे म्हणून निक्की जनतेच्या मनात घर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. हिला जनतेने वाचवावे यासाठी हे सगळं करतीये निक्की. कारण- सूरजला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा आहे म्हणून मी कशी चांगली आहे हे ती दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. हिला कोणी वोट करू नका.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “वोटसाठी निक्की सूरजचा आधार घेत आहे. महाराष्ट्राला दाखविण्यासाठी करत आहे.” तर आणखी एका नेटकऱ्याने, “निक्की घाबरलीय”, असे लिहिले आहे. अनेकांनी निक्की खरी खेळाडू आहे, असे म्हणत तिचे कौतुकही केले आहे.

हेही वाचा: Video : फिल्मी डायलॉग, हुबेहूब हसणं अन्…; अभिजीतने केली शाहरुख खानची मिमिक्री! सूरज म्हणाला…

दरम्यान, ‘जंगलराज’ टास्कमध्ये जी टीम अयशस्वी ठरली, ती संपूर्ण टीम घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली आहे. त्यानुसार निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल व वर्षा उसगांवकर हे पाच स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात आणखी काय घडणार आणि कोण घराबाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader