Bigg Boss Marathi 5 चे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत असते. कधी बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे तर कधी स्पर्धकांमध्ये झालेल्या भांडणामुळे हे सदस्य चर्चेत असतात. आता निक्कीने धनंजयला जाब विचारल्याचे कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

निक्कीने धनंजयला विचारला जाब

रविवारी बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनालेचा एक टास्क घेण्यात आला होता. त्यावरुन निक्की धनंजयला जाब विचारताना दिसत आहे. ते दोघे गार्डन परिसरात बसले आहेत. निक्की धनंजयला विचारते. “तिकीट टू फिनाले म्हणजे काय? टॉप पाच, बरोबर? टॉप पाचमध्ये मी तुम्हाला नाव विचारत नाही, पण कोणते गुण पाहिजेत?”, निक्कीच्या या बोलण्यावर धनंजय म्हणतो, “तू गुण विचारायच्या आधी अभिजीतबरोबर बोललीस तर तो तुला सांगेल की मी तुझं नाव घेतलं आहे की नाही.” निक्की म्हणते, “घेतलं असेल पण तुम्ही मुद्दा काय मांडला, ही उद्धट आहे म्हणून मी हिचं तिकीट कॅन्सल करतो, हे मला नाही पटलं सर.” त्यावर धनंजय म्हणतो की, पाचमध्ये मी तुझा विचार करत आहे. जसं तुला वाटू शकतं की हा व्यक्ती घरात करतोय काय? हे जसं अपमानजनक आहे तसंच हेदेखील असू शकतं. त्यावर निक्की म्हणते, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही माझं तिकीट टू फिनाले काढलं, त्यात काही प्रॉब्लेम नाही, त्याची जी कारणं दिली तो प्रॉब्लेम आहे.”

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

हा व्हिडीओ शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, ‘तिच्या फिनाले तिकीट वरून निक्की विचारते आहे डीपीला जाब”, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: “धर्माच्या बाबतीत मी…”, बिग बॉसमध्ये शिवाजी महाराजांचा जयजयकार न केल्याप्रकरणी अरबाज पटेलची प्रतिक्रिया

दरम्यान, घरात नुकताच एक टास्क पार पडला. ज्या सदस्यांची मते ठाम नाहीत अशा दोन सदस्यांना टार्गेट करायचे होते. यासाठी दोन गट करण्यात आले होते. टीम ए आणि टीम बी असे हे गट होते. टीम ए मध्ये निक्की, सूरज, अभिजीत आणि वर्षाताई होत्या. तर टीम बी मध्ये पंढरीनाथ कांबळे, अंकिता, धनंजय आणि जान्हवी हे सदस्य होते.

आता हे पर्व ७० दिवसात संपणार असल्याने सध्या मोठी चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. नुकताच अरबाज कमी मतं मिळाल्याने घराबाहेर पडला आहे. याबरोबरच वैद्यकीय कारणांमुळे संग्रामदेखील बिग बॉसच्या घराबाहेर गेला आहे. या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी हे स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता कोणता स्पर्धक आपल्या खेळामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करत ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.