Bigg Boss Marathi 5 Nikki Arbaz Relation Over: ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्क चालू आहे. या आठवड्यात आठही स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येत आहेत. आजच्या एपिसोडमध्ये निक्कीची आई तिला भेटायला आली असून, त्याचा प्रोमो कलर्सने शेअर केला आहे. गेले काही आठवडे निक्की व अरबाज यांच्यामध्ये नक्की काय घडतंय यावर चर्चा होताना आपण बघितल्या. दुसरीकडे अरबाजच्या गर्लफ्रेंडनंही सोशल मीडियाला राम राम ठोकला आणि चाहत्यांच्या मनात संभ्रम उत्पन्न केला होता. त्यामुळे निक्कीची आई बिग बॉसच्या सेटवर गेल्यानंतर अरबाज संदर्भात दोघांमध्ये काय बोलणं होईल अशी उत्सुकता ताणली गेली होती. परंतु निक्कीच्या आईने जे सांगितलं ते ऐकून निक्कीच्या चेहऱ्याच्या रंग उडाला आणि ती जे म्हणाली ते ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का नक्कीच बसणार आहे.

अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची मैत्री आणि जवळीक बिग बॉस मराठीच्या घरात खूप चर्चेत राहिली. अरबाज रविवारी एलिमिनेट झाला तेव्हा निक्की ढसाढसा रडली. अरबाजही भावुक झाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर निक्कीसाठी मनात भावना असल्याची कबुली अरबाजने दिली होती. घराबाहेर आल्यावर तो चाहत्यांना निक्कीसाठी वोट करा असंही म्हणतोय. दुसरीकडे त्याची गर्लफ्रेंड लीझाने सोशल मीडिया सोडला. अशातच आता बिग बॉसच्या घरात एकटी पडलेल्या निक्कीला भेटायला आता तिची आई येणार आहे. अरबाज गेल्यावर निक्की खूप रडली होती, त्याची बरीच चर्चाही झाली होती. त्यानंतर आता निक्कीच्या आईने घरात मुलीला अरबाजबद्दल जे सांगितलं ते पाहून निक्कीचा संताप अनावर झाला आहे. कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये निक्की तिचं आणि अरबाजचं नातं संपलं असं म्हणताना दिसत आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

“हिंदू मुलीच्या प्रेमात पडलास, तर २ लग्न करणार का?” अरबाज पटेल म्हणाला, “आमच्या धर्मात चार…”

निक्कीजवळ तिची आई प्रमिला तांबोळी येतात आणि म्हणतात, “अरबाज चुकीचा चाललाय, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, त्याची इंगेजमेंट झाली आहे.” यावर निक्की म्हणते, “कोणाची”? मग प्रमिला म्हणाल्या, “अरबाजची.” यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.

Video : लेकीसाठी बाबा कोकणातून पहिल्यांदाच आले मुंबईत! अंकिताला अश्रू अनावर, ‘बिग बॉस’ला म्हणाली…; पाहा भावुक प्रोमो

पुढच्या क्षणी भडकलेली निक्की म्हणते, “आता मी सांगते बिग बॉस, जर तो आला तर मी मेंटली पागल होईन. अरबाज निक्की जे होतं ना, ते सगळं संपलंय.” यानंतर निक्की अरबाजचे कपडे आणि इतर साहित्य गोळा करते आणि कॅमेऱ्यात बिग बॉसला म्हणते की हे अरबाजचे कपडे आहेत, तुम्ही ते फेकून द्या.

निक्कीच्या आईने जे सांगितलं, त्यानंतर ती भडकली आहे. अरबाज बिग बॉसच्या घराबाहेर आहे. निक्की व अरबाज यांची जोडी शो संपल्यानंतर पाहायला मिळेल, अशी शक्यता होती. पण आता मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. या एपिसोडनंतर अरबाज प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader