Nikki Tamboli Mother in Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘फॅमिली वीक’ टास्क शुक्रवारच्या भागात अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, निक्की तांबोळी व सूरज चव्हाण यांच्या घरातील सदस्य आले. या सर्वांपैकी चर्चेतली भेट ठरली ती म्हणजे निक्की तांबोळी अन् तिच्या आई-वडिलांची. निक्कीच्या आईने लेकीला दोन महिन्यांनी भेटल्यावर तिचे कान टोचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रमिला तांबोळी निक्कीला म्हणाल्या, “बेटा मला तुला हेच सांगायचंय की तू छान खेळते, सगळं चांगलं आहे पण राग लोकांना आवडत नाही.” यावर दोन-तीन आठवड्यांपासून राग कंट्रोल केला आहे, असं निक्की म्हणते. “पण लोकांना तेच दाखवलं जातं, लोक त्या गोष्टी विसरत नाही, बाकी चांगलं खेळते तू, पण तुझ्याकडून इतरांचा अनादर होतोय, ते लोकांना आवडत नाही. वर्षाताई या..” इतकं प्रमिला तांबोळी बोलताच मी त्यांना खरंच ओळखत नव्हते असं निक्की म्हणाली.

हेही वाचा – “बाईSS…”, म्हणत ‘बिग बॉस’च्या घरात आली राखी सावंत! निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला; ताज्या झाल्या ४ वर्षांपूर्वीच्या आठवणी

लोकांना वाटतं तुला मी काहीच शिकवलं नाही

पुढे त्या म्हणतात, “तुझा खेळ लोकांनी पाहिला आहे, आता आठ दिवसांत तुझं चांगलं रूप बघायचं आहे लोकांना, तू ओरिजनल कशी आहे. तुला मी हेच शिकवलं आहे का?” यावर निक्की म्हणते, “तू असं काही शिकवलं नाही, पण डोकं सटकवतात ना.” मग त्या म्हणाल्या, “लोकांना असं वाटतं हिला हिच्या आईने काहीच शिकवलं नाही. असं होतंय.” त्यावर निक्की आईसमोर तिची बाजू मांडते. “मला इथे जो राग येतोय ना तो खूप खरा आहे, पण तो का येतोय माहितीये का, समोरून पण सगळे तसं वागतात”, यावर तुझ्या स्वभावाचा इतर लोक फायदा घेतात, असं प्रमिला म्हणाल्या. मग त्या तिची समजूत घालतात आणि “तू तशा पद्धतीने रिअॅक्ट नाही व्हायचं, तू सहनशील कशी आहे, ते लोकांना दाखव,” असा सल्ला त्यांनी दिला.

Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया

पुढे वर्षाताईंनी निक्कीची बहिणीशी व्हिलन अशी ओळख करून दिली होती, ते आईला सांगितलं. तेव्हा मी काही बोलले असते तर प्रेक्षकांनी मलाच वाईट समजलं असतं. त्यावर तू तसं नाही केलं तेच चांगलं आहे, असं प्रमिला म्हणाल्या. मला या घरात कोणाशी बोलावं वाटत नाही, असंही निक्की म्हणाली. यानंतर निक्कीचे बाबा दिगंबर तांबोळी यांची घरात एंट्री होते. निक्की त्यांचे आशीर्वाद घेते आणि घरातील सदस्यांशी ओळख करून देते. ते बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात.