Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्की तांबोळी व अरबाज पटेल (Nikki Tamboli Arbaz Patel) यांची चांगली मैत्री आहे, दोघेही एकत्र गेम खेळत आहेत. दरम्यान या शोच्या सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात झटापट झाली. ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने वादानंतर निक्कीच्या कानशिलात लगावली. निक्कीच्या आईने या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. प्रमिला तांबोळी यांनी याबद्दल बोलताना अरबाजबद्दल वक्तव्य केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रमिला तांबोळी यांनी आर्याने निक्कीला मारलं त्याचा निषेध नोंदवला. मुलीची काळजी वाटते, बिग बॉसने घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. निक्कीबरोबर बिग बॉसच्या घरात सारखेच असे प्रकार घडतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Video: “माझी मुलगी मार खायला गेली आहे का?” आर्याने कानशिलात मारल्यावर निक्की तांबोळीच्या आईचा सवाल
निक्कीच्या आईने वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेवर टीका केली. संग्रामने निक्कीला पाण्यात ढकललं होतं, त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. “मागच्या आठवड्यात तो संग्राम आला, त्याने मोठ्यामोठ्या गोष्टी केल्या आणि निक्कीला सूचना न देता ‘मी तुला ढकलतो’ म्हणत अचानक तिला पाण्यात धक्का दिला. हे सगळं काय आहे? हे असं व्हायला नको ना. तिला काही त्रास झाला असेल, अचानक धक्का मारल्यावर नाका-तोंडात पाणी जातं. ठिक आहे, तिला काही झालं नाही ही चांगली गोष्ट आहे. संग्रामने जे केलं तेही योग्य नव्हतं,” असं त्या म्हणाल्या.
प्रमिला तांबोळी अरबाज पटेलबद्दल काय म्हणाल्या?
यावेळी प्रमिला तांबोळी यांनी अरबाजच्या आक्रमतेवरही भाष्य केलं. “तुम्ही सगळे बाओ करता की अरबाज असा करतो, तसा करतो.. काय केलंय अरबाजने? अरबाज कितीही आक्रमकपणा करत असेल तरीही त्याच्या आक्रमकपणामुळे कुणालाही इजा झालेली नाही, कुणाला दुखापत झालेली नाही. पण निक्कीला त्रास झाला आहे, मागे आर्या निक्कीच्या हाताला चावली, तिच्या पोटाला चावली, तिच्या हाताला तिने एवढं घट्ट आवळून धरलं की तिचा हात किती तरी दिवस काळा पडला होता. त्याची पण बिग बॉसने दखल घेतल्याचं दिसलं नाही. कारण शनिवार-रविवारच्या एपिसोडमध्येही ते दाखवलं नाही. हे असं कसं? छोट्या-छोट्या गोष्टीसाठी उकरून काढतात आणि दाखवतात. पण निक्कीबद्दल घरामध्ये सारखं सारखं असं होतंय,” असं त्या म्हणाल्या.
निक्कीच्या आईने आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. “आर्याने तिला मारलं. तिने शारीरिक हिंसा केली. प्लीज बिग बॉस, या प्रकरणाची काहीतरी गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. आमची मुलगी मुलगी बिग बॉसच्या घरात काय मार खायला गेली आहे का? हे चुकीचं आहे. हात जोडून विनंती आहे. माझ्या मुलीला संरक्षण मिळालं पाहिजे, तरच आम्ही निश्चिंतपणे हा शो बघू शकू. आर्या नकोय आता घरात. काढा तिला बाहेर,” असं प्रमिला तांबोळी म्हणाल्या.