Bigg Boss Marathi 5व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेली निक्की तांबोळी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. टास्कमध्ये ज्याप्रकारे ती स्ट्रॅटजी वापरते, घरातील इतर स्पर्धकांबरोबर होणारी तिची भांडणे, यामुळे निक्की तांबोळी सतत चर्चेत असते. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निक्की बिग बॉसला उद्देशून मला जमिनीवर आणले असे म्हणताना दिसत आहे.

काय म्हणाली निक्की?

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये निक्की चहा करत आहे, मात्र तिचा धक्का लागून भांडे खाली पडते. भांडे पडल्याचा आवाज येताच अरबाज आणि वर्षा उसगावंकर तिला विचारतात, “काय झालं?” त्यावर निक्की साडीमुळे सगळं खाली पडलं असे सांगते. त्यानंतर धनंजय पगार मिळणार नाही असे ओरडताना दिसत आहे. निक्की बिग बॉसला उद्देशून हसत म्हणते, “बिग बॉस मला तुम्ही जमिनीवर आणलंय, हा काय प्रकार?” त्यानंतर खाली पडलेली पावडर काढून सफाई करत असल्याचे दिसत आहे. वर्षा उसगांवकर तिला म्हणतात, “काय बघतेय मी हे, काय दृश्य आहे. व्वा निक्की, अभिनंदन, जनतेला नवीन निक्कीचं दर्शन दिल्याबद्दल. काय साफ केलंस?” त्यावर निक्की त्यांना म्हणते, “छान केलं ना, मी काम तर चांगलंच करते.” वर्षा उसगांवकर म्हणतात, “१०० टक्के मार्क्स देते मी तुला.” असा मजेशीर संवाद सुरू असल्याचे दिसत आहे.

kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
appear in Celebrity MasterChef show coming soon
‘बिग बॉस मराठी ५’ फेम निक्की तांबोळी ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार, सोबतीला असणार उषा नाडकर्णींसह प्रसिद्ध कलाकार
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार?
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट
कलर्स मराठी इन्स्टाग्राम

वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीमध्ये पहिल्या आठवड्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत वाद होताना दिसले आहेत. निक्कीने त्यांचा वाईट शब्दात अपमान केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. आधीच्या पर्वातील स्पर्धकांनी आणि इतर कलाकारांनी तिच्यावर टीका केली होती.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या भाऊचा धक्का एपिसोडमध्ये रितेश देशमुखने निक्कीची कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहे. तिने इतर सदस्यांसाठी वापरलेल्या शब्दांसाठी तिला शिक्षादेखील दिली आहे. रितेश देशमुखने तिला म्हटले, “कौतुक मनात ठेवायचे असते, डोक्यात गेले की त्याची हवा होते.”

हेही वाचा: “डोकं लावून गेम खेळलो नाही…”, ‘डबल ढोलकी’ आरोपाविषयी घन:श्याम स्पष्टच बोलला; घराबाहेर आल्यावर पहिली प्रतिक्रिया

आता येणाऱ्या आठवड्यात निक्की तांबोळी आपल्या खेळात काय बदल करणार, का रितेश देशमुखच्या ओरडण्याचा आणि शिक्षा देण्याचा तिच्यावर काही परिणाम होणार का? या आठवड्यात ती कोणता नवीन कल्ला करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader