Bigg Boss Marathi चा शो असा आहे की, ज्यामध्ये कोणती गोष्ट कधी घडेल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. कोणत्या सदस्यांमध्ये कधी शत्रुत्व निर्माण होईल आणि कोणामध्ये कधी मैत्री निर्माण होईल याचे आडाखेदेखील कोणी मांडू शकत नाही. बिग बॉसच्या घरातील सदस्य प्रेक्षकांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींना आश्चर्यचकित करीत असतात. आता बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अंकिता आणि निक्की अभिजीत सावंतविषयी बोलताना दिसत आहेत.

काय म्हणाली निक्की?

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, निक्की अंकिताला म्हणते, “माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याला तुझ्यावर आहे. कारण- तुम्ही पहिल्या दिवसापासून एकमेकांबरोबर आहात. आमची मैत्री वाढली; पण त्याचं तुझ्याबरोबर असलेलं नातं तसंच आहे. जेव्हा तुझं नाव घेतलं होतं, त्यावेळी तो म्हटला होता, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. माझ्याहून वरचा दर्जा तो तुला देतो आणि त्याला तुझी गरजपण आहे. पण, तू बोलत नाही आहेस. ठीक आहे, तुझ्या डोक्यात काहीही विचार असेल. मी फक्त इथे स्पष्ट करायला आलीय की, जर त्याला तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणाला निवडायचं असेल, तर तो नेहमीच तुला निवडेल.” अंकिता निक्कीचे बोलणे शांतपणे ऐकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”
Devendra Fadnavis news On evm hack
Devendra Fadnavis on EVM: ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी देशमुख बंधूंच्या निकालाकडे दाखविले बोट; म्हणाले, “लातूरमध्ये…”
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Milind Gawali
मिलिंद गवळी यांचे सहकलाकाराबद्दलचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “भीती वाटायची की, आता मार…”
Muramba
Video: “आता राजा-राणीचा संसार…”, संकटावर मात करत रमा-अक्षय आले एकत्र; ‘मुरांबा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी म्हणाले, “कोणताच काटा…”
asid kumar modi palak sidhwani tmkoc
TMKOC : सोनूची भूमिका करणाऱ्या पलक सिधवानीच्या आरोपांना असित मोदींचे प्रतिउत्तर म्हणाले, “तिचे मानधन…”

आता निक्कीच्या या बोलण्यानंतर अंकिता आणि अभिजीत पुन्हा एकत्र येणार का? त्यांची मैत्री पूर्ववत होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे निक्की आणि अंकिता यांना एकत्र पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अनेक नेटकऱ्यांनी, “निक्की अंकिताला भटकवत आहे”, असे म्हटले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी, “निक्की चांगली आहे”, म्हटले आहे.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

आता बिग बॉसच्या घरात भाऊच्या धक्क्यानंतर नवीन आठवड्यात कोणती समीकरणे बदलणार आणि कोणत्या सदस्यांची मैत्री आणखी खुलणार, हे या आठवड्यात पाहायला मिळेल.

हेही वाचा: “मी जेलमध्ये असताना माझ्या मित्रांबरोबर वडील दारू प्यायचे”, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने स्वतः केला खुलासा, म्हणाली…

नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अंकिता वालावलकरची फिरकी घेतली होती. तिला सगळ्यात कमी मत मिळाले असून, घराबाहेर जाण्यास ती पात्र ठरली आहे, असे म्हणत तिच्यासाठी मुख्य दरवाजा उघडला होता. मात्र, रितेश देशमुखने ही गंमत केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी घरातील अनेक सदस्य भावूक होताना दिसले.

आता या आठवड्यात कोणत्या सदस्यांमध्ये कोणता नवीन कल्ला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader