Bigg Boss Marathi 5 व्या सीझनची प्रदर्शित होण्याआधीपासूनच मोठी चर्चा सुरू होती. पहिले कारण म्हणजे मराठी बिग बॉसच्या चार पर्वांचे सूत्रसंचालन दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले होते; परंतु या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळत असल्याने याची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते.

बिग बॉसच्या या पर्वाची मोठी चर्चा होण्याचे दुसरे कारण म्हणजे या सीझनमधील स्पर्धक होय. या वर्षी बिग बॉसच्या घरात कलाकारांबरोबरच सोशल मीडिया एनफ्लुएन्सरदेखील स्पर्धक म्हणून दिसत आहेत. त्यामुळे त्याबाबतही मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता यावर बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सामील झालेली अभिनेत्री आरती सोळंकीने एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले आहे.

Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Pandharinath Kamble
“मी पॅडीबरोबर शो केला आहे, तो टास्कमध्ये नेहमी…”, अभिनेत्रीने केली पंढरीनाथ कांबळेच्या गेमची पोलखोल
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
Bigg Boss Marathi Season 5 Siddharth Jadhav Angry On Janhvi Killekar for insulted pandharinath kamble
“एकदा का तो सुटला की तुझी…”, पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीवर भडकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला…
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?

काय म्हणाली अभिनेत्री?

‘अल्ट्रा बझ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत आरती सोळंकीने म्हटले, “आता कितीतरी सिनेमे येऊन गेले, ज्यामध्ये रीलस्टारला घेतले होते, ते किती चालले? पण यापेक्षाही कुठल्या प्रेक्षकांनी जाऊन त्यांच्यासाठी सिनेमा बघितला, त्यांचं कौतुक केलं. मी फार सोशल मीडियावर वावरत नाही. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात; आम्ही कलाकार आमच्या पद्धतीने काम करतो. प्रत्येक जण त्यांच्या ठिकाणी स्टार आहे. ते फॉलोअर्समध्ये स्टार असतील; आम्ही कलेमध्ये स्टार आहोत. त्यांना बघण्यासाठी कुणी तीनशे-पाचशे रुपयांचं तिकीट काढणार नाही. याचं कारण सामान्य प्रेक्षकांनाही माहीत आहे आणि खासकरून मराठी प्रेक्षक तर नाहीच नाही.”

हेही वाचा: वडिलांची ‘ती’ अट आणि अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी केलं लग्न, बिग बींनी स्वतःच केला खुलासा

“आता जे काही सिनेमे रीलस्टारना घेऊन केले होते, ते किती चालले? हे माझं उत्तर यावर आहे. सतत माझ्या हातात मोबाईल असतो, तर कोणतेच कलाकार ३०-३० सेकंदांचे व्हिडीओ करीत बसत नाहीत; ते रीलस्टार करतात. काही चांगले व्हिडीओ बनवणाऱ्यांना आपणदेखील फॉलो करतो; पण मी ५०० रुपये देऊन त्यांचा सिनेमा नाही बघणार.” एन्फ्लुएन्सरमुळे कलाकारांना काम मिळत नाही, हे खरंच होतंय का? यावर तिचं मत काय आहे, या प्रश्नावर तिने बोलताना हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वाला सुरू होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. १६ स्पर्धकांपैकी तीन स्पर्धकांनी बिग बॉसच्या घराला निरोप दिला आहे. त्यामध्ये कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले व योगिता चव्हाण या तिघांचा समावेश आहे. आता या चौथ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.