Nikki Tamboli Dialogue Dance Video Viral: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व चांगलेच चर्चेत आहे. हा रिअॅलिटी शो सुरू होऊन एक महिना झाला आहे. महिनाभरात सर्वाधिक चर्चा जर कोणत्या सदस्याची झाली असेल तर ती म्हणजे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) होय. डोंबिवलीकर निक्की तांबोळी घरातील जवळपास प्रत्येक सदस्याशी भांडली. या शोमध्ये तिच्या भांडणाबरोबरच तिचा एक डायलॉगही चांगलाच गाजतोय. तिच्या या डायलॉगची क्रेझ प्रेक्षकांमध्येही आहे. कारण तिच्या त्या डायलॉगवर आता चक्क पुणेकर थिरकले आहेत.
टास्क असो, गेम खेळणं असो वा घरातील सदस्यांशी भांडणं करणं असो निक्की तांबोळी कायम पुढे असते. घरातील इतर स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत ‘बाईSSS’ हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मीम बनले. घरातील सदस्यही तिची याच शब्दावरून बऱ्याचदा फिरकी घेत असतात. ‘बाईSSS’, ‘बाईSSS हा काय प्रकार’ हे निक्कीचे डायलॉग आता सोशल मीडियावरही हिट झाले आहे. निक्कीच्या या डायलॉगची क्रेझ पुणेकरांमध्येही आहे. कारण पुण्यात दहिहंडीच्या कार्यक्रमात निक्कीच्या आवाजातील ‘बाईSSS’ वाजवण्यात आलं.
Bigg Boss Marathi…अन् सगळ्यांशी भांडणारी निक्की ढसाढसा रडली! अरबाजबद्दल म्हणाली, “मी या मुलासाठी…”
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत डीजे गाण्यात निक्कीच्या आवाजातील ‘बाईSSS’ वाजलं आणि त्यावर पुणेकरांनी मनसोक्त डान्स केला. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. ‘पुणेरी आवाज’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ –
अनेकांनी हा व्हिडीओ निक्की तांबोळीला टॅग करत इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिने त्यापैकी एक व्हिडीओ स्टोरीला रिपोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. “ही आहे आपल्या मराठी मुलीची क्रेझ”, असं या स्टोरीवर लिहून ही स्टोरी तिच्या अकाउंटवरून रिपोस्ट करण्यात आली आहे.
बिग बॉसच्या घराबाहेर निक्कीची तुफान क्रेझ आहे, पण ताज्या एपिसोडमध्ये मात्र निक्की बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडताना दिसली. निक्कीला तिच्याविषयी घरात काय चुगल्या केल्या जातात, याबाबत रितेशने तिला व्हिडीओ दाखवला, यानंतर निक्की, अरबाज, जान्हवी व वैभव यांच्या मैत्रीत फूट पडली आहे. अशातच मंगळवारी टास्कदरम्यान झालेल्या भांडणानंतर निक्की रडताना दिसली.