Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावर टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वाहिन्यांकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर गेल्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. परंतु, या सगळ्यात प्रेक्षकांना एका कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता होती. तो कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन केव्हा सुरु होणार याची प्रेक्षकांकडून वारंवार विचारणा होत होती. अशातच काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स मराठी’ने ‘बिग बॉस मराठी’ची पहिली झलक त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती. यावेळी ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन मराठीसह बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याचं समोर आलं.

हेही वाचा : “बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

रितेश देशमुखवर त्याच्या लाखो चाहत्यांसह ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॉसिप, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अनुभवायला मिळेल. आता नव्या भागात कोण झळकणार? नवीन शो केव्हा सुरु होणार असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. ‘कलर्स वाहिनी’ने नुकताच ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रितेशसह अभिनेता निखिल रत्नपारखीची झलक पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात यापूर्वी झालेले वाद पाहून निखिल रितेशला सांगतो “सर, ही आहे बिग बॉसची दुनिया…हे सगळ्या सीझनमध्ये असंच असतं, तुम्ही पाहून घ्या पहिल्यांदाच होस्ट करताय” यावर रितेश म्हणतो, “यापुढे हे असंच नसणार… आता मी आलोय कल्ला तर होणारचं तोही माझ्या स्टाइलने” यावरून यंदा ‘बिग बॉस मराठी’मध्ये कोणत्या गोष्टी नवीन पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब अन् चेतना भटचा ‘बाई गं’वर जबरदस्त डान्स! स्वप्नील जोशीने केली खास कमेंट

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या या दुसऱ्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी “लवकरात लवकर हा कार्यक्रम केव्हा सुरु होणार, वेळ काय असेल” हे आम्हाला सांगा अशी मागणी कमेंट्स सेक्शनमध्ये केली आहे. तर, विशाल निकम, किरण माने, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, शिल्पा नवलकर, शिव ठाकरे, गायत्री दातार यांनी आधीच्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी सुद्धा या नव्या प्रोमोचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 riteish deshmukh hosting the show new promo out now sva 00