Bigg Boss Marathi Bhau Cha Dhakka : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा पहिलाच वीकेंडचा वार रितेश देशमुख आज घेणार आहे. पहिल्याच आठवड्यात घरातील सगळ्या स्पर्धकांनी राडा घातल्याचं पाहायला मिळालं. अनेक स्पर्धकांच्या वागणुकीवर प्रेक्षकांसह इतर मराठी कलाकारांकडून टीका देखील करण्यात आली. या सगळ्या सदस्यांची शाळा आता थेट रितेश देशमुख घेणार आहे.

रितेश देशमुखचा होस्ट म्हणून यंदाचा पहिलाच सीझन असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा लाडका भाऊ स्पर्धकांची कशी शाळा घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर नेहमीच प्रेमाने वागणाऱ्या रितेशने आपलं दुसरं रुप या सदस्यांना दाखवलं आहे. समोर आलेल्या पहिल्या प्रोमोनुसार सुरुवातील अभिनेत्याने निक्कीचा समाचार घेत मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल तिला सर्व प्रेक्षकांची माफी मागण्यास सांगितलं.

Male teacher hug female student obscene video school student teacher viral video
“अरे तुझ्या मुलीसारखी ना ती?”, एकट्या विद्यार्थीनीला पाहून शिक्षकाने मारली मिठी अन्…, शाळेतील धक्कादायक VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”
Tula Shikvin Changalach Dhada new actor entry
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये आला नवीन पाहुणा! ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, ‘तो’ क्षण पाहून अधिपतीचे डोळे पाणावले…
Andhra College Student Jumps Off 3rd Floor
Viral Video : शिक्षकासमोरच वर्गातून उठून बाहेर गेला अन् गॅलरीतून मारली उडी; विद्यार्थ्याची ऑन कॅमेरा आत्महत्या
Lakhat Ek Aamcha Dada
Video: पुष्पा काकीच्या ‘त्या’ कृतीमुळे तुळजासमोर सत्य येणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा सुरेश धस यांच्याकडून उल्लेख; म्हणाले, “आरोपी आकाच्या मुलाभोवती…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “आता सगळ्यांचा माज उतरणार”, रितेश देशमुखने निक्कीला सुनावल्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठी माणसांबद्दल…”

आता निक्की पाठोपाठ रितेश देशमुख पंढरीनाथ कांबळेवर बरसणार आहे. खरंतर या आठवड्यात ‘बिग बॉस’ने देखील पंढरीनाथला “दुसऱ्यांच्या खेळाचं कौतुक करण्यापेक्षा स्वत:चा खेळ खेळा” असं सांगितलं होतं. परंतु, त्यांच्यात सुधारणा न झाल्याने आता भाऊच्या धक्क्यावर रितेश पंढरीनाथला झापणार आहे.

Bigg Boss Marathi मध्ये रितेश देशमुख घेणार सर्वांची शाळा

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश सांगतो,”यंदा ‘बिग बॉस’ने एका प्रेक्षकाला या घरात एन्ट्री दिलेली आहे. ते लपून छपून तुमचा खेळ पाहत आहेत. पण, स्वत: काहीच करत नाहीयेत. ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे.” रितेशने नाव घेतल्यावर पंढरीनाथ त्यांच्याकडे बघत असतो… यावर अभिनेता “मला हा लूक देऊ नका पंढरीनाथजी…” असं त्याला सांगतो.

हेही वाचा : Video: “हात खाली, आता मी बोलतोय”, रितेश देशमुखने घेतला निक्कीचा समाचार; म्हणाला, “मराठी माणसाचा अपमान…”

हेही वाचा : Video : मुग्धा वैशंपायनच्या सासुरवाडीत भक्तीमय वातावरण; प्रथमेशसह गायलं भजन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर व रितेशच्या एकंदर अंदाजावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अगर ट्रेलर ऐसा है तो पिक्चर क्या होगा?”, “भाऊचा धक्का एकदम कडक भाऊ”, “खतरनाक…”, “झोपेतून जाग करणे गरजेचे आहे”, “रितेश भाऊंचा धक्का..पहिल्याच वीकेंडला सर्वांना देतोय बुक्का…”, “हा माऊली नाराज नाही करणार…तुमचे शब्द खरे होत आहेत”, “मस्त रितेश भाऊ” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या Bigg Boss Marathi च्या प्रोमोवर केल्या आहेत.

Story img Loader