Abhijeet Sawant Birthday: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सूरज चव्हाणने (Suraj Chavan) जिंकले आणि अभिजीत सावंत उपविजेता ठरला. ७० दिवसांच्या या प्रवासात ‘जेंटलमन’ अशी ओळख मिळालेला अभिजीत सावंत टॉप २ मध्ये पोहोचला, पण शो जिंकू शकला नाही. सूरज चव्हाण जिंकल्यावरही त्याने आनंद व्यक्त केला. या बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता अभिजीत सावंतचा आज वाढदिवस आहे, शोचा ग्रँड फिनाले झाल्यानंतर त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. त्याने कुटुंबाबरोबरच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिजीत सावंतने पत्नी शिल्पा व दोन्ही मुलींबरोबर वाढदिवस साजरा केला. त्याने व्हिडीओ शेअर करून त्याला बिग बॉसच्या प्रवासात पाठिंबा देणाऱ्यांचे तसेच हा शो पूर्ण बघणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
“मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. पण माझ्या बिग बॉस मराठीच्या प्रवासाचा एक भाग असलेल्या प्रत्येकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!
तुमचे प्रेम हीच माझी खरी ट्रॉफी आहे
तुमचे प्रेम मला आयुष्यात पुढे जाण्याचे बळ देते, थँक्यू फॉर एव्हरीथिंग!” असं कॅप्शन अभिजीतने या व्हिडीओला दिलं आहे.
अभिजीत सावंतने शेअर केलेला व्हिडीओ-
हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”
अभिजीत केक कापण्यापूर्वी म्हणाला, “ज्यांनी ज्यांनी मला वोट केले, बिग बॉस मराठी हा पूर्ण शो बघितला, त्या सर्वांना धन्यवाद. आज माझा वाढदिवस आहे. मी माझा वाढदिवस माझे कुटुंबीय आणि मित्रांबरोबर साजरा करतोय. हा स्पेशल केक माझ्या बायकोने तुम्हा सर्वांसाठी बनवला आहे. सर्वांना धन्यवाद.”
अभिजीतच्या या पोस्टवर कमेंट्स करून चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मेघा धाडेने अभिजीतला शुभेच्छा दिल्या. तसेच या पोस्टवर कमेंट्स करून चाहते त्याला जेंटलमन म्हणत कौतुक करत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd