Bigg Boss Marathi 5 हे पर्व सध्या अनेकविध कारणांमुळे चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्यात या घरात नवीन काहीतरी घडताना दिसते. सदस्यांमधील समीकरणे बदलताना दिसतात. काही वेळा घरातील सदस्यांमध्ये गमती-जमती घडतानादेखील दिसतात. आता पंढरीनाथ कांबळे आणि सूरज चव्हाण यांचा एक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण आणि पंढरीनाथ कांबळे हे गार्डन परिसरात असून, त्यांच्यामध्ये मजेशीर संवाद सुरू आहे. पंढरीनाथ सूरजला म्हणतो, “… तर पुढच्या नॉमिनेशनमध्ये माझ्याकडून तुझं नाव असेल.” त्यावर सूरज म्हणतो, “मी नाही भीत, तुम्ही किती काही करा.” पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “मी तुला भितोय होय रे.” सूरज म्हणतो, “या घरात मी तर कोणालाच भीत नाही.” त्यानंतर सूरज म्हणतो, “मी फोडणार म्हणजे फोडणार आणि फाडणार.”

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
Bigg Boss Marathi season 5 Abhijeet Kelkar share post on Sangram Chougule entry
“खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
bigg boss marathi season 5 pranit hatte angry on nikki tamboli
“निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे…”, मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख काही बोलले नाही तर…”
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
कलर्स मराठी इन्स्टाग्राम

पंढरीनाथ विचारतो, “तू काय करणार?” सूरज पंढरीनाथच्या पोटाला हात म्हणतो, “तुमच्या ढेरीच्या चकल्या करीन. तुम्ही शांत बसायचं. गप बसायचं, तोंडावर बोट ठेवायचं आणि एक शब्दपण बाहेर काढायचा नाही.” त्यावर पंढरीनाथ म्हणतो, “तोंडावर म्हणजे ओठाच्या वर?” सूरज हो म्हणतो आणि विचारतो, “तुमच्या पोटात बुक्की हाणू का?” पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “हां, तुला करायचंय ते कर बाबा, तुला कोण काय बोलणार? तू किंग आहेस ना, तू काहीही करू शकतोस.” असा हलका-फुलका संवाद त्यांच्यात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांनी केले सूरज आणि पंढरीनाथ कांबळेचे कौतुक

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने, “पॅडीदादा अशीच साथ द्या सूरजला”, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “पॅडीदादा निर्म पणे सूरजची साथ देतोय”, असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने, “खूपच सुंदर जोडी आहे”, अशी प्रतिक्रिया कमेंट करीत दिली आहे. एक नेटकरी म्हणतो, “पंढरीसाहेब तुम्ही सूरजला बाहेर आल्यानंतरही असेच सांभाळा.”

हेही वाचा: सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित

दरम्यान, या आठवड्यात धनंजय पोवार, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, अरबाज पटेल हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता बिग बॉस मराठीच्या घरात कोणता नवीन कल्ला होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.