Bigg Boss Marathi 5 वे पर्व सध्या मोठ्या चर्चेत आहे. या घरातील अनेक गोष्टींबाबत सतत चर्चा होताना दिसतात. आता बिग बॉसच्या घरातील सदस्य निक्की तांबोळीविषयी चर्चा करताना दिसत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य एकत्र बसून निक्की तांबोळीविषयी चर्चा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिता वालावलकर, आर्या, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, घन:श्याम, वर्षा उसगांवकर हे सदस्य एकत्र बसले असून ते निक्की तांबोळी(Nikki Tamboli)विषयी बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Gautam Gambhir abused my family Manoj Tiwary allegations on Gautam Gambhir
Manoj Tiwary : ‘त्याने माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली अन्…’, मनोज तिवारीने पुन्हा एकदा साधला गौतम गंभीरला केलं लक्ष्य
Hindi is not Indias national language R Ashwins controversial statement video viral
R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
sanjay raut
Sanjay Raut : “संतोष देशमुखप्रकरणी सुरेश धस पुरेसे, फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय…”, संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत!
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ

अरबाज पटेल काय म्हणाला?

अरबाज म्हणतो, “तिचं काय झालं माहितेय का अंकिता? अरबाजने माझ्यासाठी खूप काही केलं, तो आता चांगला दिसतोय, तर त्याला वाईट कसं दाखवता येईल, असा विचार तिने केला. तर मी असं काहीतरी करते; ज्यामुळे अरबाज उलटसुलट गोष्टी करील आणि लोकांना तो चुकीचा वाटला पाहिजे.” त्यावर धनंजय पोवार म्हणतो, “मला काय वाटतंय माहितेय का? तिला आता कळून चुकलंय की जान्हवी, वैभव, अरबाज हे तर आता मला जवळ करणार नाहीत. तिचा प्लान हाच असणार आहे की, आता मी हे कसं सिद्ध करू? त्यांच्यात परत जाण्यासाठी किती प्रयत्न केलेत; पण हे लोक प्रयत्न करत नाहीत, असं तिला दाखवायचं आहे”, असं संभाषण या व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

हेही वाचा: ‘दुर्गा’ मालिका मिळाल्यावर अंबर गणपुळेच्या होणाऱ्या पत्नीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, शिवानी सोनार म्हणाली, “आता तू माझ्या…”

चौथ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं निक्की तांबोळीला तिच्या ग्रुपमधील लोक तिच्या पाठीमागे काय बोलतात, याचे व्हिडीओ तिला दाखवले होते. त्यावेळी निक्की तांबोळीनं टीम एमधील कोणत्याही सदस्याला ट्रॉफी घेऊ देणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर निक्की आणि अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण यांच्याशी सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं भांडण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये मैत्री पाहायला मिळत आहे.

आता या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर व अंकिता वालावलकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता घरात कोणता नवीन कल्ला होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Story img Loader