Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. सहा दिवसांत या दिवसात बरीच भांडणं पाहायला मिळाली. पहिल्याच दिवसापासून हा शो चर्चेत आहे. आता सहाव्या दिवशी या घरात पुन्हा एकदा शाब्दिक वाद रंगला व नंतर हाणामारी झाल्याचं प्रोमोमध्ये दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. घरातील बहुतांशी सदस्यांबरोबर निक्की तांबोळी भांडली होती. पण आज झालेल्या भांडणात निक्की नाही तर तर दुसऱ्या दोघी आहेत. आजच्या एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर व आर्या जाधव यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 5 मधील स्पर्धकांबद्दल किरण माने यांची स्पष्ट भूमिका; म्हणाले, “‘या’ तिघांनी कितीही मूर्खपणा केला तरीही…

‘बिग बॉस मराठी’चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींबरोबर जोरदार भांडताना दिसून येत आहे. यावेळी जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठी ५ शोचा होस्ट रितेश देशमुख आहे.

Jahnavi Killekar Arya Fight: प्रोमोची सुरुवात जान्हवीपासून होते. किचनमध्ये असलेली जान्हवी म्हणते,”नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती”. त्यावर आर्या म्हणते,”माझ्यामध्ये तुम्ही येऊ नका आता”. मग जान्हवी आर्याला म्हणते, “किती दिवस ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राहतेस ना तेच बघते मी”. त्यानंतर दोघीमध्ये कडाक्याचं भांडण होतं व त्या एकमेकींवर हात उगारताना दिसतात. प्रोमोमध्ये हाणामारीचे आवाज येतात पण नेमका कोणी कोणावर हात उचलला ते या एपिसोडमध्येच कळेल.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

पाहा व्हिडीओ-

आर्या व जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात काय घडणार, दोघींनी खरंच हाणामारी केली असेल तर बिग बॉस त्यांना काय शिक्षा देणार हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.

दिशा पाटनीच्या बहिणीने शेअर केले लष्करी गणवेशातील फोटो; भावुक कॅप्शन पाहून चाहते म्हणाले, “तुझा अभिमान वाटतो”

बिग बॉस ५ मधील स्पर्धक

Bigg Boss Marathi 5 Contestants List: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 updated jahnavi killekar arya jadhav fight watch video hrc