Bigg Boss Marathi 5 चे पर्व हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असल्याचे दिसते. सध्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या टास्कमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. संग्रामच्या खेळामुळे बी टीममधील सदस्य त्याच्यावर नाराज असल्याचे दिसत आहेत. अंकिताने त्याला जाबदेखील विचारल्याचे पाहायला मिळाले आहे. आता मात्र समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये वर्षा उसगांवकर आणि धनंजय पोवार यांच्यामध्ये मोठा कल्ला झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वर्षा उसगांवकर अन् धनंजय पोवारमध्ये जोरदार भांडण

कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला धनंजय हा वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि संग्राम चौगुले यांना टास्कबद्दल सांगत असतो. तो म्हणतो, “पहिल्या फेरीमध्ये संग्राम, जान्हवी आणि अरबाजमध्ये डील ठरलं होतं.” त्यानंतर तो वर्षा उसगांवकरांना विचारतो, “तुम्हाला मी हेच सांगितलं होतं ना?” त्यावर वर्षा उसगांवकर, “नाही” असे म्हणतात. त्यानंतर धनंजय चिडला असून तो म्हणतो, “तोंडावर बोलतो मी सगळ्यांच्या.” त्यावर वर्षा उसगांवकर म्हणतात, “तू उगाच ओरडू नकोस” त्यावर धनंजय म्हणतो, “तुम्ही ओरडायला भाग पाडत आहात, कारण तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाहीये.” वर्षा उसगांवकर म्हणतात, “तू तोंडावर पडला आहेस”, त्यांच्या या बोलण्यावर धनंजय म्हणतो, “तोंडावर पडत नाही, शड्डू ठोकून उभा राहतोय मी” हे म्हणताना धनंजय पोवार शड्डू ठोकताना दिसत आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
इन्स़्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने, ‘वर्षाताई आणि DP मध्ये झालाय कल्ला, घरात कोणाच्या डील ठरल्यात?’, अशी कॅप्शन दिली आहे.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात जंगलराज असणार होते. यामध्ये वेगवेगळे टास्क पाहायला मिळाले. यादरम्यान अनेक गमती जमती घडल्याचेदेखील दिसले.

हेही वाचा: राज कपूर जिच्या प्रेमात होते, तिच्याच मुलीसाठी ‘या’ अभिनेत्याने राज यांच्या लेकीशी लग्न मोडलेलं; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

दरम्यान, धनंजय पोवार हा पहिल्या आठवड्यापासून बी टीममध्ये खेळत होता. आता गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. आता यापुढे त्याचा खेळ कसा असणार, त्याच्या वर्षा उसगांवकरांबरोबरच्या भांडणात त्याला कोण साथ देणार का, पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच या आठवड्यात कॅप्टन कोण होणार, भाऊच्या धक्क्यावर कोणत्या स्पर्धकाची शाळा घेतली जाणार आणि कोणत्या स्पर्धकाला शाबासकी दिली जाणार, आणखी कोणता कल्ला होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Story img Loader