Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची अनेकविध गोष्टींमुळे मोठी चर्चा होताना दिसत आहे. आज बिग बॉसच्या घरात ‘नवरा माझा नवसाचा २’मधील कलाकार हजेरी लावणार आहेत. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सुप्रिया पिळगांवकर आणि वर्षा उसगांवकर एकमेकींच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स करणार असल्याचे दिसत आहे.

वर्षाताई आणि सुप्रियाताई यांचा डान्स

कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नीलेश साबळे म्हणतो, “सुप्रियाताई तुमचं गाणं लागेल, त्यावर वर्षाताईंनी परफॉर्म करायचा आहे आणि वर्षाताईंच गाणं लागेल, त्यावर सुप्रियाताई तुम्ही परफॉर्म कराल.” त्यानंतर वर्षा उसगांवकर ‘हे पाऊल पुढे जरा…’, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांना स्वप्नील जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर साथ देताना दिसत आहेत. त्यानंतर ‘मी आले…’, या गाण्यावर सुप्रिया पिळगांवकर डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर अशोक सराफ यांना नीलेश साबळे विचारतो, “तुमच्या घरी बिग बॉस कोण आहे? तुम्ही की निवेदिताताई?” या प्रश्नावर उत्तर देताना अशोक सराफ यांनी म्हटले, “माझ्या मर्मावर बोट ठेवलं तुम्ही.” त्यांच्या या उत्तरावर सगळे हसताना दिसत आहेत.

zee marathi lakshmi niwas dalvi family dances on koli song
Video : वसईच्या नाक्यावरी…; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील दळवी कुटुंबाचा कोळी गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra kesari Kaka Pawar on Shivraj Rakshe About Controversy
Maharashtra Kesari: “महाराष्ट्र केसरीच्या पंचांना जन्मठेप देणार का?” शिवराज राक्षेच्या निलंबनानंतर कुस्ती प्रशिक्षकांचा संतप्त सवाल, नेमकं काय म्हणाले?
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Sudha Murty touches Javed Akhtar feet video viral
Video: मंचावर सुधा मूर्ती पडल्या जावेद अख्तर यांच्या पाया; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “संपूर्ण देश त्यांना…”
Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Loksatta vyaktivedh Satish Alekar Marathi Theatre Writing Director and Actor
व्यक्तिवेध: सतीश आळेकर
mns leader amey khopkar urge to marathi filmmaker
“थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर…”, मनसे नेत्याची पोस्ट चर्चेत; मराठी सिनेमाकर्त्यांना म्हणाले, “लवकरच तारीख…”
कलर्स मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, आज घरात एकमेकांच्या सदाबहार गाण्यांवर वर्षाताई आणि सुप्रियाताई यांचा रंगणार धमाल डान्स!, अशी कॅप्शन दिली आहे.

नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट २० सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असल्याचे दिसत आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाई करणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता असल्याचे दिसत आहे. सचिन पिळगांवकरांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, ते अभिनयदेखील करताना दिसत आहे. त्याबरोबरच सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, निर्मिती सावंत, वैभव मांगले हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.

हेही वाचा: ‘नवरा माझा नवसाचा २’ पाहिल्यावर उत्कर्ष शिंदेकडून भलीमोठी पोस्ट शेअर, म्हणाला, “हा चित्रपट क्षमा…

दरम्यान, काल वैद्यकीय कारणांमुळे संग्राम चौगुलेला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. आता नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी कोण घरातून बाहेर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच पुढील काळात घरातील सदस्यांची एकमेकांबरोबर कशी समीकरणे असणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Story img Loader