Bigg Boss Marathi 5 चे पाचवे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या भांडणामुळे, कधी त्यांना दिलेल्या टास्कमुळे तर कधी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे बिग बॉसचे हे पर्व चांगलेच चर्चेत आहे. आता बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलर्स मराठीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी बाहेर बसलेल्या सदस्यांना फळांची बास्केट नेऊन देत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला धनंजय पोवार आणि पंढरीनाथ कांबळे मोठमोठ्याने हसत आहेत. अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, वर्षा उसगावंकर, सूरज चव्हाण, निखिल दामले हे सदस्य गार्डन परिसरात बसून गप्पा मारत आहेत.

हेही वाचा: पाच वर्षांचे अफेअर अन् वर्षभरापूर्वी लग्न; बॉलीवूड अभिनेत्री होणार आई, म्हणाली, “बिअरच्या बाटल्यांपासून…”

गार्डनमधील आवाज ऐकू येताच वैभव चव्हाण म्हणतो, “पिकनिक चालू झाली का परत?” त्यावर तेथील सदस्य त्याला सहमती दर्शवताना दिसतात. किचनमध्ये इरिना फळे कापत आहे आणि वैभव तिला म्हणतो की, अजून काप पिकनिकमध्ये नेऊन देता येतील. त्यानंतर जान्हवी फळांची बास्केट घेऊन बाहेर बसलेल्या सदस्यांकडे येते आणि त्यांना म्हणते की, ही बास्केट बिग बॉसने द्यायला सांगितली आहे, मजा करा, असे ती म्हणते. तिच्या या कृतीवर पंढरीनाथ कांबळे तिला धन्यवाद म्हणताना दिसत आहे. याबरोबरच तिला मीठ-मसालापण द्यायला नाही सांगितला का? असे पंढरीनाथ विचारतो. त्यावर जान्हवी म्हणते, देऊ? त्यावर वर्षा उसगांवकर, करायचंच आहे तर सेवा करून घेऊ, असे म्हणत प्लेट्स आणायला सांगते.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

दरम्यान, बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासून भांडण पाहायला मिळत आहे. याबरोबरच दोन गट तयार झाले असून या दोन्ही गटांत सतत कुरबुरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता बिग बॉ़सच्या घरात नुकताच कॅप्टन पदाचा टास्क आयोजित केला होता. यामध्ये टीम ए जिंकली होती. आता या टीममधून एक कॅप्टन निवडला जाणार आहे. या टीममध्ये निखिल दामले, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, घन:श्याम दरेकर, सूरज चव्हाण हे स्पर्धक आहेत. आता यांच्यामधून एका स्पर्धकाला कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे.

याबरोबरच, या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणता सदस्य घरातून बाहेर पडणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 5 video janhvi killekar offer fruits to other contestant watch nsp