Bigg Boss Marathi 5 Voting And Elimination : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. आज घरात खास बीबी पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी घरातील सदस्यांचं मनोरंजन करण्यासाठी खास डीजे क्रेटेक्स उपस्थित राहणार आहे. मात्र, या पार्टीनंतर सगळ्या स्पर्धकांना ‘बिग बॉस’कडून एक मोठा धक्का मिळणार आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर असे सात सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’ जिंकल्यामुळे ती यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली आहे. तर, उर्वरित ६ सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. यांच्यापैकी एकाला आज ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. क्रेटेक्सच्या बीबी पार्टीनंतर घरात मिडवीक एव्हिक्शन होणार आहे.
मिडवीक एव्हिक्शनची सोशल मीडियावर चर्चा
‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्यात प्रवेश करणारे ( टॉप ५ किंवा टॉप ६ ) स्पर्धक कोण असतील हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक सदस्य घराचा निरोप घेणार आहे. सात जणांपैकी कोण ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेणार याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर आणि मराठी कलाविश्वातील ‘वंडरगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा उसगांवकर यांच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार असणार आहे.

नेटकऱ्यांमध्ये अंकिता आणि वर्षा यांच्यापैकी एकाने घराचा निरोप घेतला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या अनेक फॅन पेजेसनी अंकिता वालावलकर एव्हिक्ट झाल्याचं म्हटलं आहे तर, काहींनी वर्षा उसगांवकरांचा प्रवास संपल्याच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. नेटकऱ्यांनी देखील ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत अकाऊंटवर आजच्या मिडवीक एव्हिक्शनबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा : “प्रेक्षकांच्या मतांमुळे सूरज जिंकेल पण, गेमचा विचार केला तर…”, Bigg Boss च्या विजेत्याबद्दल शिव ठाकरेचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

दरम्यान, आता ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घराचा प्रत्यक्षात कोण निरोप घेणार हे आजच्या ( ३ ऑक्टोबर ) भागात स्पष्ट होणार आहे. तर, यानंतर महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे.