Bigg Boss Marathi 5 चा महाअंतिम सोहळा रविवारी (६ ऑक्टोबर) पार पडला. ७० दिवसांत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सूरज चव्हाणने प्रेक्षकांची मने जिंकत बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वावर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या यशाचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. त्यातच त्याचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

काय म्हणाला सूरज चव्हाण?

व्हिडीओमध्ये, सूरज चव्हाण फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. त्याच्या एका हातात ट्रॉफी आहे. तो ट्रॉफी दाखवत आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये त्याच्या विजयाबद्दल अभिनंदन, असे म्हटल्यावर त्याने धन्यवाद म्हणत प्रतिसाद दिला आहे. त्यावेळी कोणीतरी त्याला विचारले, “सूरज, गावी जायला उत्सुकता आहे ना?”, त्यावर त्याने म्हटले, “गावी लय डीजे लागलेत. १०-१० डीजे आहेत”, असे त्याने म्हटले आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेल्या सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या कॉमेडी व्हिडीओंमुळे तो प्रसिद्ध आहे. मात्र, जेव्हा त्याने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तो हा खेळ खेळू शकेल का, असेही अनेकांना वाटले होते. बऱ्याच जणांनी त्याला या शोमध्ये घेतल्यामुळे बिग बॉसला ट्रोलदेखील केले होते.

सिने मराठी इन्स्टाग्राम

अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदेंनी याबद्दलची आठवण सांगितली होती. त्यांनी म्हटले होते, “जेव्हा सूरज पहिल्या दिवशी बिग बॉसमध्ये दिसला तेव्हा सोशल मीडियावर बिग बॉसला ट्रोल केलं गेलं. तुम्ही काय खालच्या पातळीला बिग बॉस घेऊन जात आहात. कोणालाही आणताय, अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या होत्या. पण, त्याच्यामधली माणुसकी आम्हाला दिसली होती.”

हेही वाचा: Video : “ट्रॉफी मिळाली नाही याची खंत…”, ग्रँड फिनालेनंतर धनंजयची पहिली पोस्ट! भावुक होत म्हणाला, “हे उपकार…”

आता सूरजने प्रेक्षकांसमोर ‘बिग बॉस मराठी ५’च्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने बिग बॉसच्या ७० दिवसांच्या प्रवासात प्रेक्षकांची मने जिंकली. परिणामी तो या पर्वाचा विजेता ठरला आहे; तर बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता अभिजीत सावंत ठरला आहे.

Story img Loader