Bigg Boss Marathi Aarya Jadhao : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक घटना घडली होती. आर्या जाधवने कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्कीला कानशिलात लगावली होती. त्यामुळे ‘बिग बॉस’ने आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. तिला अचानक घरातून एक्झिट घ्यावी लागली. आर्याला बाहेर काढल्यानंतर नेटकरी ‘बिग बॉस’वर प्रचंड नाराज झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निक्कीने सुद्धा आर्याप्रमाणे चुका केल्या आहेत…त्यामुळे दोघींना समान शिक्षा व्हावी अशी मागणी आर्याचे चाहते आणि ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांकडून केली जात होती. मात्र, केवळ आर्यालाच घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. घराबाहेर आलेल्या या अमरावतीच्या रॅपर गर्लला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आर्याने देखील “माझे प्रेक्षकच माझी ट्रॉफी आहेत” असं वक्तव्य अनेक मुलाखतींमध्ये केलं आहे.

हेही वाचा : ठरलं! ‘बिग बॉस’चे दोन्ही सीझन एकमेकांना भिडणार, मराठीचा महाअंतिम सोहळा अन् हिंदीचा ग्रँड प्रीमियर, तारीख जाहीर…

जयने घेतली आर्याची फिरकी

आर्याने ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतल्यावर आधीच्या पर्वातील काही स्पर्धकांनी सुद्धा तिच्या खेळाचं कौतुक केलं होतं. आता तिसऱ्या पर्वाचा उपविजेता जय दुधाणेने आर्याची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. दोघांनी त्यांच्या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जय यावेळी ‘बिग बॉस’ची नक्कल करताना दिसला.

जय म्हणतो, “बिग बॉस सांगू इच्छितात की, आर्या तुम्ही निक्कीला खूप चांगली कानाखाली मारली” हे वाक्य ऐकताच आर्या हसते आणि जयला सांगते, “तू उगाच काहीतरी वादग्रस्त बोलू नकोस.” यावर अभिनेता म्हणतो, “अरे वादग्रस्त नाही…तुझं सगळेजण कौतुक करत आहेत ना…तसंही ती गोष्ट तू शोमध्ये केली. आता रात गयी बात गयी समज आणि विसरून जा…माझ्यामते सर्व प्रेक्षकांनी पण तुला पाठिंबा दिलाय’ यावर आर्या सांगते, “हो! मला महाराष्ट्राची वाघीण म्हणत आहेत” असं संभाषण दोघांमध्ये सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील सगळे ८ सदस्य झाले Nominate! ‘बिग बॉस’ने दिला मोठा धक्का, काय आहे कारण?

हेही वाचा : Bigg Boss Marathi – घराबाहेर आलेल्या अरबाज पटेलची निक्कीसाठी पहिली पोस्ट; प्रेक्षकांना विनंती करत म्हणाला, “तिला बिग बॉस…”

Bigg Boss Marathi : आर्या जाधव व जय दुधाणे

दरम्यान, आर्या जाधवबद्दल सांगायचं झालं तर, ती प्रसिद्ध रॅपर म्हणून ओळखली जाते. MTV Hustle या शोमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस मराठी’मुळे तिचा चाहतावर्ग आणखी वाढला.