Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून आता महिना उलटला असला तरीही या शोचे सगळे स्पर्धक आजही चर्चेत आहे. यंदा ‘बिग बॉस’च्या सीझनमध्ये आर्याने निक्कीला कानाखाली मारण्याची घटना घडली होती. यानंतर निक्कीने संपूर्ण घरात गोंधळ घालून तिला तातडीने घराबाहेर काढण्याची मागणी केली. प्रोजेक्ट हेड तसेच ‘बिग बॉस’च्या संपूर्ण टीमने या प्रकरणाची खात्री करून, वारंवार व्हिडीओ क्लिप्स तपासून आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, यामुळे ‘बिग बॉस मराठी’चे प्रेक्षक तसेच आर्याचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आर्याने केलेलं कृत्य चुकीचं असलं तरीही निक्कीच्या गैरवर्तनामुळे तिने असं पाऊल उचलल्याचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर आर्याला शोमधून निष्कासित करण्यात आलं होतं. यामुळे आर्याचे फॅन्स चांगलेच पेटून उठले होते. याशिवाय टीव्हीवर आर्याने निक्कीला कानशि‍लात लगावल्याची क्लिप सुद्धा दाखवली नव्हती. एकंदर या संपूर्ण प्रकरणावर आर्याने एका रॅपच्या माध्यमातून भाष्य करत आपल्या भावना मांडल्या होत्या. याशिवाय अनेक मुलाखती देऊन तिने तिची बाजू देखील स्पष्ट केली होती. आता पुन्हा एकदा आर्या जाधवने लिहिलेला एक नवीन रॅप सर्वत्र चर्चेत आला आहे. या रॅपमधले संदर्भ पाहता अमरावतीच्या या ‘धाकड गर्ल’ने निक्कीला अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : “एका काकूंनी त्यांच्या मुलीची ओळख करून दिली अन्…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, “हा यश…”

आर्याने जाधवचा नवीन रॅप

सकाळी पाच वाजता उठून मी काहीतरी लिहिलंय. कदाचित नंतर डिलीट करेन…तर ऐका

पुछ रहे थे बार-बार के पास किधर हैं
कही छुपे होंगे शायद मेरे पास किलर हैं
I Will Bang Even If I Get Behind Back
तभी Naturally Glowing Botox किधर हैं
थक गए पुछ-पुछ के की QK ( आर्याचं टोपणनाव ) किधर हैं
अरे बावरी पुछ के तेरा GK किधर हैं
अभी आयी बिग बॉस से मैं जिती नही
लेकीन वो पुछे आगे को की, लिप फिलर है क्या
I Mean I’m not proud of it you know
But पसंद आता तब Thank Me About it You Know
You Know-You Know Nothing About you know क्यू की दिखाया हीं नही वो व्हिडीओ
तभी पुछे तुने कैसी मारी?
मैं बोलू धाड-धाड
पहले दुखी थी बिचारी, अब ना रहेती Sad वॅड
मैने घर ही बोला…अच्छा सुनो Dad-Dad मैने ठिक तो किया ना?
वो भी कहेते I Am Glad

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/11/aarya_599564.mp4

हेही वाचा : अक्षराला मोठा धक्का! अधिपती चारुलताला म्हणणार ‘आईसाहेब’; सुनेला वेडं ठरवण्यात यश…; पाहा प्रोमो

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात निक्कीने नाकाची सर्जरी केल्याचं आणि ‘लिप फिलर्स’ केल्याचं सांगितलं होतं. याशिवाय आर्याने निक्कीच्या कानशि‍लात मारलेल्याचा व्हिडीओ देखील अद्याप कुठेच दाखवण्यात आलेला नाही. तसेच याप्रकरणी निक्की व आर्या यांच्या कुटुंबीयांनी देखील आपल्या मुलींची बाजू घेत आरोप-प्रत्यारोप केले होते. हा सगळा संदर्भ आर्याच्या नव्या रॅपमध्ये आहे. त्यामुळे हा संपूर्ण रॅप आणि त्यामधले शब्द वाचून आर्याचा रोख निक्कीकडे असल्याचं स्पष्ट होत आहे.