Bigg Boss Marathi Aarya Jadhao Post For Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ पाचव्या सीझनमध्ये महिन्याभरापूर्वी आर्याने निक्कीच्या कानशिलात मारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर फुटेज तपासून ‘बिग बॉस’ने आर्याला भाऊच्या धक्क्यावर निर्णय घेऊन घराबाहेर काढलं होतं. या निर्णयानंतर आर्याचे चाहते व ‘बिग बॉस’चे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. अखेर या पर्वाची आता सांगता झाली असून यंदाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे.

सर्वांना ‘गुलीगत धोका’ देत सूरज ( Bigg Boss Marathi ) यावर्षीचा विजेता ठरला आहे. सध्या मनोरंजन विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. आर्यासह घराबाहेर आल्यावर अनेक सदस्यांनी सूरज किंवा ‘टीम बी’च्या कोणत्या तरी सदस्याने ही ट्रॉफी जिंकावी अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर सर्वांचा अंदाज खरा ठरवत या चुरशीच्या लढाईत सूरजने बाजी माली आहे.

Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Marathi actor Siddharth Jadhav answer to those who called Ranveer Singh of the poor
गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”

हेही वाचा : पॅडी दादांच्या हातात ट्रॉफी दिली, मिठी मारली अन्…; सूरज-पंढरीनाथचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी भावुक, म्हणाले, “दोन खरी माणसं…”

Bigg Boss Marathi : आर्याची सूरजसाठी पोस्ट

आर्या पोस्ट शेअर करत लिहिते, “ट्रॉफी जिंकली माझ्या भावाने! एकदम झापुक झुपूक काम केलंय भावा!” या पोस्टबरोबर तिने एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे रितेश अन् सूरजचा Winning सेल्फी! विजेत्याची घोषणा केल्यावर रितेशने सूरजसाठी खास पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं होतं. हाच फोटो आर्याने तिच्या स्टोरीवर रिशेअर करत सूरजचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, सूरज ट्रॉफी जिंकल्यावर आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला, “मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि ‘बिग बॉस’चे मनापासून आभार मानतो. मला प्रचंड अभिमान आहे की, मी ‘बिग बॉस’ची ही ट्रॉफी जिंकली. मी आधीच म्हणालो होतो, यंदा ट्रॉफी मीच जिंकणार आणि ही ट्रॉफी ‘झापुक झुपूक’ पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार…ते आज खरं झालं आहे. आपला पॅटर्न एकदम हटके आहे. गुलीगत पॅटर्न…बुक्कीत टेंगूळ!”

हेही वाचा : सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

Bigg Boss Marathi Aarya Jadhao Post For Suraj Chavan
आर्याची सूरजसाठी पोस्ट (Bigg Boss Marathi Aarya Jadhao Post For Suraj Chavan )

सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. असंख्य मराठी कलाकारांसाठी सुद्धा सूरजसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

Story img Loader