Bigg Boss Marathi : आर्या जाधवने ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळीला कानशि‍लात मारण्याची घटना घडली होती. यानंतर निक्कीने रडून, गोंधळ घालून आर्याला ताबडतोब घराबाहेर काढा अशी मागणी शोच्या टीमकडे केली होती. मात्र, याआधी निक्कीने सुद्धा अशाचप्रकारे अनेकदा आपल्यावर हात उचलला असल्याचा दावा आर्याकडून करण्यात आला होता. पुढे, भाऊच्या धक्क्यावर लाइव्ह फुटेज चेक करून आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेपासून दोघींमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. कारण, आर्याला घराबाहेर काढणं हे तिच्या चाहत्यांसह ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना रुचलेलं नव्हतं.

घराबाहेर आल्यावर आर्याने ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) प्रवासावर रॅप लिहून आपलं मत मांडलं होतं. मध्यंतरी हा वाद शांत झाला असं सर्वांनाच वाटत असताना आता पुन्हा एकदा या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आर्याने शेअर केलेल्या एका रॅपवर, “ही फुटेज खातेय” असा आरोप निक्कीच्या एका फॅनपेजने केला होता. हीच इन्स्टाग्राम स्टोरी निक्कीने रिशेअर करत त्यावर “एक मोटा हाथी…” हे गाणं लावलं होतं. यावर आर्याने व्हिडीओ शेअर करत प्रतिउत्तर दिलं आहे.

Saif Ali Khan Attack Updates kareena kapoor first reaction
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट! म्हणाली, “प्रचंड आव्हानात्मक दिवस…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”

हेही वाचा : “आयुष्यभर असाच रुबाबदार…”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची रोमँटिक पोस्ट! म्हणाली…

आर्याने व्हिडीओ शेअर करत मांडलं मत

आर्या या व्हिडीओमध्ये म्हणते, “मला इन्स्टाग्रामवर एका मुलीचा मेसेज आला… त्यात असं लिहिलं होतं की, निक्कीची स्टोरी बघ. मी पाहिलं तेव्ह निक्कीने कोणाची तरी स्टोरी रिपोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की, आर्या अजूनही निक्कीच्या नावाने फुटेज खातेय. निक्की मॅडमने त्या पोस्टला “एक मोटा हाथी…” असं गाणं लावलं होतं. तू चांगलं फॅट शेमिंग करतेस निक्की… पण, प्लीज…मी पण एक रॅपर आहे. माझ्या लिखाणातून मी उत्तर देणार. तुम्हाला वाटतं ना मी गप्प राहावं मग मला उगाच भिडू नका. रॅप लिहिणं हे माझं काम आहे त्यामुळे मला जे वाटतं ते मी नक्कीच लिहिणार आणि त्यातून उत्तर देणार.”

“जर मला तुझ्या नावाने फुटेज हवं असतं… तर, मी घरात ( Bigg Boss Marathi ) राहून जिंकून आले असते. तुला मारून घराच्या बाहेर नसते आले. तरीही आज लोक मला चांगलं बोलत आहेत. सगळे म्हणत होते अजून ४-५ पाच ( कानाखाली ) का नाही मारल्यास… त्यामुळे प्लीज Get Over Yourself… आली मोठी मला भिडायला. मुलाखतींमध्ये ही मुलगी माझ्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घाबरत होती. तिच मुलगी आता माझ्याबद्दल स्टोरीज टाकून फुटेज घेतेय…घे दिलं मी तुला फुटेज” असं रोखठोक मत आर्याने या स्टोरीजमधून मांडलं आहे.

हेही वाचा : Video: जिनिलीया आणि रितेश देशमुखच्या हुडीवर लिहिलेल्या शब्दांनी वेधलं लक्ष; पाहा व्हिडीओ

याशिवाय निक्कीच्या या पोस्टवर उत्तर देण्यासाठी आर्या वजन काट्यावर उभं राहून तिचं सध्याचं वजन जाहीरपणे सर्वांना सांगितलं आहे. लवकरच म्हणजेच “३० नोव्हेंबरपर्यंत मी ६० किलो वजन करेन” असं तिने म्हटलं आहे. तसेच “मी वजन कमी करण्यात यशस्वी झाले नाही… तर, बँकेतून १ लाख रुपये तुला ट्रान्सफर करेन” असंही आर्या ( Bigg Boss Marathi ) या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

Story img Loader