Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आर्याची रवानगी ‘बिग बॉस’च्या टीमकडून त्वरीत जेलमध्ये करण्यात आली होती. यानंतर रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्यावर तिला ‘बिग बॉस’ने घराबाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटला होता. आर्याच्या चाहत्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आर्या-निक्कीमध्ये झालेल्या वादासंदर्भात सर्वत्र बरीच चर्चा झाली. अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. निक्की सतत घरात सर्वांना त्रास देत असते त्यामुळे आर्याला घराबाहेर काढणं अनेकांना योग्य वाटलं नव्हतं. अखेर या संपूर्ण घटनेवर ‘बिग बॉस’चे ‘बॉस’ केतन माणगावकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड’ केतन माणगावकर यांनी ‘नवशक्ती’शी संवाद साधताना याबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी या घटनेनंतर नेमकं काय-काय घडलं? टीमकडून कसे निर्णय घेण्यात आले याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 च्या विजेत्याला मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख, पण…; यात आहे एक मोठा ट्वि्स्ट, पाहा व्हिडीओ

केतन माणगावकर सांगतात, “या शोबरोबर प्रेक्षक भावनिकरित्या जोडले जातात. मेकर्स म्हणून आम्ही खूप त्रयस्थपणे या गोष्टीकडे पाहतो. शोमध्ये आम्ही सर्वांना कास्ट करतो. त्यामुळे निक्की म्हणा किंवा आर्या दोघी आमच्यासाठी समान होत्या. प्रत्येक आठवड्यात जो माणूस बाहेर जातो तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मला होतो. जेव्हा अशी घटना घडते तेव्हा एक माणूस म्हणून प्रचंड त्रास होतो. या घटनेकडे जेव्हा आपण एक माणूस म्हणून पाहतो तेव्हा मला अजिबात आवडणार आणि पटणार नाही की, कोणी कोणावर हात उचलावा…हेतुपूर्वक एखाद्यावर हात उचलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्या हा एक इंटरनॅशनल शो आहे. आम्हाला देखील याचे नियम दिलेले आहेत आणि घरात एखाद्यावर कोणीही हात उचलू शकत नाही हा त्या घराचा मुलभूत नियम आहे.”

ते पुढे म्हणाले, “बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) हा मनावर ताबा ठेवण्याचा शो आहे. समोरच्याने तुम्हाला कितीही त्रास देऊदे…तशी परिस्थिती निर्माण झाली तरीही तुम्ही स्वत:च्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. ‘बिग बॉस’च्या नियमांमध्ये हे क्लिअर लिहिलेलं आहे की, जर कोणी हिंसा केली, तर संबंधित व्यक्ती घराबाहेर जाईल. त्यामुळे आम्हाला नियम पाळणं गरजेचं होतं.”

Bigg Boss Marathi : ‘एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड’ केतन माणगावकर

दुसऱ्या पर्वात सुद्धा घडलेली अशीच घटना

“बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील अशीच घटना घडली होती आणि तेव्हा पराग कान्हेरेला आम्ही थेट बाहेर काढलं होतं. बाकी ‘बिग बॉस’च्या सीझनमध्ये देखील अशा घटना घडलेल्या आहेत. परागला आम्ही लगेच बाहेर काढलं पण, यावेळी आर्याला तात्पुरतं जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही त्यानंतर ते फुटेज वारंवार पाहिलं. कारण, टास्कमध्ये अनेकदा धक्काबुक्की होते… त्यामुळे संपूर्ण व्हिडीओ आम्ही वारंवार पाहिला. यावेळी मी होतो, केदार शिंदे होते…प्रथमेश देसाई आणि आमची अख्खी टीम होती. सगळे नियम आम्ही पुन्हा वाचले. एन्डमोलशाईनच्या मॅनेजमेंटबरोबर चर्चा झाली. सगळ्या बैठका, चर्चा झाल्यावर आर्याला नियमानुसार घर सोडावं लागेल हा निर्णय घेण्यात आला.” असं केतन माणगावकरांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : निक्कीची टीम ‘मालक’! ‘हे’ ४ सदस्य झाले ‘सांगकामे’, वर्षा यांचे पाय दाबले, तेल लावलं अन्…; जान्हवीला अश्रू अनावर

प्रेक्षकांचा विश्वास महत्त्वाचा

“मला असं वाटतं तो निर्णय घेणं गरजेचं होतं कारण, आम्ही जेव्हा नवीन सीझन करू तेव्हा एखादा सदस्य म्हणू शकतो अरे…तिकडे तर कानाखाली मारतात मला या शोमध्ये यायचं नाहीये. याशिवाय एखाद्यावर बंधन नसेल, तर अशा गोष्टी वारंवार होत राहतील. त्यामुळे तो निर्णय घेण्यात आला. इतकी वर्षे जर हा शो नियमांमध्ये बसून तुमचं मनोरंजन करतोय…तर प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.” असं स्पष्ट मत ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) म्हणजेच केतन यांनी मांडलं आहे.