Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यासाठी सध्या ‘जादुई हिरा’ मिळवण्याचा टास्क चालू आहे. या टास्कदरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन भडकलेल्या आर्याने निक्कीच्या कानशि‍लात वाजवल्याची घटना ‘बिग बॉस’च्या घरात घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीसाठी अरबाज, धनंजय, वैभव, सूरज आणि वर्षा उसगांवकर हे पाच उमेदवार पात्र ठरले होते. या पाच जणांपैकी एकाला घराचा कॅप्टन होण्याची संधी मिळणार होती. यासाठी ‘बिग बॉस’ने ‘जादुई हिरा’ हा नवीन टास्क सदस्यांना दिला होता. या टास्कमध्ये घरातील विविध भागांमध्ये पेटीत बंद करून हिरे/स्टोन ठेवण्यात आले होते. बझर वाजवल्यावर जो सदस्य सर्वात आधी हिरा उचलेल त्याला जादुई खोलीत जाऊन एका सदस्याला बाद करण्याची संधी मिळणार होती. यानुसार पहिला हिरा जान्हवीने उचलला आणि तिने अनपेक्षितपणे अरबाजला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर केलं.

हेही वाचा : “Well Played भावा…”, पंढरीनाथचा खेळ पाहून सिद्धार्थ जाधवची पोस्ट; टास्कमध्ये अरबाज अन् वैभवला पळवलं…

Bigg Boss Marathi : जादुई हिऱ्याचा टास्क

Bigg Boss Marathi : आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली

दुसऱ्या फेरीत वैभवने हिरा उचलला यावेळी त्याने सुरजला या शर्यतीतून बाद केलं. आता फक्त वैभव, धनंजय आणि वर्षा या तीन सदस्यांमध्ये कॅप्टन्सीची लढत होणार होती. ‘बिग बॉस’कडून पुन्हा एकदा घराच्या विविध परिसरात जादुई पेट्या ठेवण्यात आल्या. यापैकी एक पेटी वॉशरुममध्ये होती. याठिकाणी ‘टीम बी’ने वर्षा उसगांवकरांना बसवलं होतं तर, आर्या कोणीही आत येऊ नये म्हणून वॉशरुमचा दरवाजा घट्ट धरून उभी होती. यावेळी निक्कीने अरबाजला हा दरवाजा येऊन ढकल असं सांगितलं.

निक्कीच्या सांगण्याप्रमाणे अरबाजने दरवाजा जोरात ढकलला आणि निक्कीने वॉशरुममध्ये प्रवेश घेतला. मागोमाग जान्हवी सुद्धा हिऱ्याचं रक्षण करण्यासाठी आत आली. याचदरम्यान आर्या- निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन वाद झाले आणि भडकलेल्या आर्याने निक्कीला कानाखाली वाजवली. यानंतर निक्की रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन “बिग बॉस… हिने मला मारलंय आणि मी हे सहन करून घेणार नाही” असं जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत होती. एकीकडे निक्कीचा गोंधळ सुरू असताना आर्या अंकिताला “मला या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाहीये. होऊ दे काय ते…गेली तर गेली घरी” असं म्हणत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video : कोकणातलं घर, भातशेती अन्…; तितीक्षा तावडेने नवऱ्याला दाखवलं निसर्गरम्य गाव अन् माहेरचं घर; पाहा व्हिडीओ

निक्की हा संपूर्ण टास्क सगळीकडे जाऊन मनमानी करत असल्याचं नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळालं. मात्र, काहीही असलं तरी, शारीरिक हिंसा करणं ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात मान्य नाही. कोणालाही मारहाण करणं हे ‘बिग बॉस’च्या नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे निक्कीने ‘बिग बॉस’कडे दाद मागितल्यावर सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बसवण्यात आलं.

‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) यानंतर म्हणाले, “आर्या आणि निक्कीमध्ये जे काही घडलं ते अतिशय निंदनीय आहे आणि ‘बिग बॉस’ याप्रकरणी आर्या यांना कठोर शिक्षा सुनावणार आहेत.” आता आर्याला या प्रकरणी काय शिक्षा होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय निक्कीने “एकतर आर्याला घराबाहेर काढा नाहीतर मी बाहेर जाते” अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi aarya slaps nikki now bigg boss going to punish her read what exactly happened sva 00