Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे टास्क त्वरीत थांबवण्यात आला. याशिवाय निक्कीने संपूर्ण घरात आरडाओरडा करून रडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आता थेट ‘बिग बॉस’ या प्रकरणावर निर्णय देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्याने कानाखाली मारल्यावर निक्कीने थेट ‘बिग बॉस’कडे मागणी करत “एकतर ही या घरात राहील, नाहीतर मी राहीन” असं म्हटलं आहे. त्यामुळे आर्या प्रकरणावर काय निर्णय होणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल. यावर आता मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. त्या ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे घरातील खेळ त्यांनी देखील खूप जवळून पाहिला आहे. सुरेखा काय म्हणाल्या जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “संग्रामची शक्ती खूप कमी पडली…”, अरबाजच्या युक्तीचं आणि खेळाचं पहिल्यांदाच कौतुक; तिसऱ्या पर्वातील सदस्याची पोस्ट चर्चेत

सुरेखा कुडची यांची पोस्ट

योग्य की अयोग्य?

काल आर्याने निक्कीच्या कानाखाली वाजवली असं म्हणत आहेत. खरंतर एपिसोड मध्ये असं काहीच क्लिअर दिसत नाहीये. तो अरबाज बोंबलत सुटला डायरेक्ट थप्पड मारली म्हणून… आणि मग काय निक्कीने तेच उचलून धरलं. वास्तविक पाहता तसं कुठेही दिसलं नाहीये. बाकी काल जान्हवीचा गेम आवडला… पॅडी ही छान खेळला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : “मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून…”, जान्हवीचं निक्कीला ओपन चॅलेंज; म्हणाली, “दम असेल तर…”

Bigg Boss Marathi : मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांची पोस्ट चर्चेत

Bigg Boss Marathi – नेमकं काय घडलं?

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात कॅप्टन्सी टास्क सुरू होता. यावेळी ‘टीम बी’ बहुमताने खेळत होती. अरबाजला जान्हवीने कॅप्टन्सीच्या शर्यतीतून पहिल्याच डावात बाद केलं होतं. त्यामुळे निक्की प्रचंड संतापली होती. संपूर्ण घरात तिचा मनमानी कारभार सुरू होता. आर्याने निक्की ‘जादुई हिरा’ घ्यायला येईल या भीतीने बाथरुमचा दरवाजा बंद केला होता. मात्र, निक्कीने “हा दरवाजा उघडून दे” असं अरबाजला सांगितलं. यानंतर अरबाजने ताकदीने दरवाजा उघडला. एवढ्यात जान्हवी सुद्धा वॉशरुममध्ये आली. इकडेच निक्की-आर्यामध्ये झटापट होऊन आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावल्याची घटना घडली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi aarya slaps nikki surekha kudachi reaction on this incident sva 00