Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाल्याने नियमानुसार सर्व सदस्यांना घरात जोडीने वावरणं बंधनकारक केलं होतं. अरबाज-आर्जा, वर्षा-अंकिता, अभिजीत-निक्की अशा जोड्या ‘बिग बॉस’कडून बनवण्यात आल्या होत्या. अशा अनोख्या जोड्या बनवल्याने ‘बिग बॉस’च्या घरात या आठवड्यात अनेकांच्या मैत्रीची समीकरणं आता बदलल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आठवडाभर घरात झालेली भांडणं आणि एकंदर सगळे रुसवे-फुगवे बाजूला ठेवून स्पर्धकांनी भाऊच्या धक्क्यावर धमाल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) भाऊच्या धक्क्यावर आजच्या भागात घरातील सदस्यांचे जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. हे परफॉर्मन्स स्पर्धकांना ‘बिग बॉस’ने बनवलेल्या जोड्यांनुसार सादर करायचे आहेत. या आठवड्यात निक्की-अभिजीतची जोडी बनवण्यात आली होती. त्यामुळे या दोघांनी भाऊच्या धक्क्यावर जबरदस्त डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा : मोठा ट्विस्ट! व्होटिंग लाइन्स बंद तरीही अंकिता घराबाहेर? रितेशने जाहीर करताच सर्वांना अश्रू अनावर; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

अभिजीत-निक्कीचा भाऊच्या धक्क्यावर डान्स

अरबाजला निक्की आणि अभिजीतची मैत्री नेहमीच खटकत आली आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर निक्की-अभिजीतने मैत्रीवर आधारित गाण्यावरच डान्स केला. शाहरुख खान व काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील ‘ये लडका है दीवाना’ या आयकॉनिक गाण्यावर निक्की-अभिजीत थिरकले. हे २६ वर्षांपूर्वीचं मैत्रीवर आधारलेलं गाणं आजही बॉलीवूड प्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. भाऊच्या धक्क्यावर ( Bigg Boss Marathi ) या सदाबहार गाण्यावर डान्स करताना दोघांनीही एकमेकांना उत्तम साथ दिली. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ ‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “निक्कीसाठी Handsome सदस्य घरात आणायचा अन् ती प्रेमाचे…”, विशाखा सुभेदार संतापली; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हेही वाचा : RHTDM : एकेकाळी ठरला फ्लॉप, आता हाऊसफुल्ल! २३ वर्षांनी प्रदर्शित झाल्यावर आर माधवनच्या चित्रपटाने कमावले तब्बल…

Bigg Boss Marathi : अभिजीत – निक्कीच्या डान्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

निक्की-अभिजीतच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्चा पाऊस पाडला आहे. “अभिजीत-निक्की खूप सुंदर नाचले”, “निक्की कशी पण असो ती या आठवड्यात चांगली वागली”, “यांचा डान्स बघून बाकीचे जळत असतील”, “निक्की अभिजीतची झकास मैत्री” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिजीत-निक्कीच्या डान्सवर दिल्या आहेत. दरम्यान, निक्की-अभिजीतप्रमाणे घरातल्या अन्य सदस्यांनी देखील विविध लोकप्रिय गाण्यांवर डान्स केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi abhijeet and nikki tamboli dance on bollywood song video viral sva 00