Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात बाहुल्यांरुपी दोन बाळांचं आगमन झालं होतं. या टास्कमध्ये निक्कीच्या टीमने बाजी मारली. मात्र, हा टास्क संपल्यावर घरात एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल घरात केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सर्वत्र नाराजी पसरली आहे.

“निक्कीने बिग बॉसने पाठवलेल्या बाहुलीचं तंगडं तोडलं” असं वर्षा उसगांवकरांनी म्हटलं. यावर प्रतिउत्तर देताना निक्की म्हणाली, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत…” यानंतर अंकिता प्रचंड भावुक झाली, तिने लगेच निक्कीची कानउघडणी करत हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे असं सांगितलं. यानंतर काही वेळाने वर्षा यांच्या मातृत्त्वावर वक्तव्य करून चूक केली असं निक्कीने अरबाजशी संवाद साधताना मान्य केलं अन् दुसऱ्या दिवशी सकाळी तिने वर्षा यांची माफी मागितली.

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Dhananjay Munde and SambhajiRaje Chatrapati
“धनंजय मुंडेंना अजित पवार संरक्षण का देत आहेत?”, संभाजीराजे छत्रपतींचा थेट प्रश्न; म्हणाले, “मराठा वि. वंजारी…”
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar : “माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला…”; सुधीर मुनगंटीवार यांचा अंगुलीनिर्देश कुणाकडे?
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
Image Of Sharad Pawar And Supriya Sule.
“शरद पवार व सुप्रिया सुळेंनी आता घरी बसावं”, भाजपा मंत्र्यांची खोचक टिप्पणी!

“अक्षम्य चूक आहे तरीही ठिके” असं बोलून वर्षा यांनी हा विषय बंद केला. परंतु, निक्कीच्या या वागणुकीबद्दल सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत निक्कीच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : “वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य?”, निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे मोठा वाद; माफी मागूनही नेटकरी संतापले…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी ( फोटो सौज्य : कलर्स मराठी )

मराठी अभिनेता अभिजीत केळकरने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. निक्कीचं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे असं अभिनेत्याने संताप व्यक्त करत म्हटलं आहे.

Bigg Boss Marathi बद्दल अभिजीत केळकरची पोस्ट

वर्षा ताई तुमच्या संयमाला सलाम! आणि शाब्बास अंकिता तू अगदी करेक्ट स्टँड घेतलास…

एखाद्या बाईच्या मातृत्त्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं? मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी विषयावर बोलणाऱ्या माणसांचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं…पण वर्षा ताई, तुमच्या संयमाला सलाम!

हेही वाचा : Bigg Boss Marathi Video : “दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा…”, अंकिता घन:श्यामवर प्रचंड भडकली! ‘बिग बॉस’च्या घरातील नवा प्रोमो चर्चेत

दरम्यान, निक्कीने केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल रितेश देशमुखने तिची शाळा घेतली पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या आठवड्यात योगिता चव्हाण, सूरज, अभिजीत सावंत आणि निखिल दामले हे सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोणता सदस्य घराचा निरोप घेणार हे येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल.

Story img Loader