Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात घरात सध्या बाहुल्यांरुपी बाळांचं आगमन झालेलं आहे. या बाळांची सेवा करण्यासाठी ‘बिग बॉस’ने घरात दोन गट पाडले आहेत. एका टीममध्ये अरबाज, जान्हवी, निक्की, घन:श्याम हे सदस्य आहेत. तर दुसऱ्या टीममध्ये अंकिता, अभिजीत, वर्षा, निखिल, पंढरीनाथ हे सदस्य आहेत. वैभव आणि आर्या या टास्कचे संचालक आहेत.

‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) हा टास्क सुरू होण्यापूर्वी स्पर्धकांना काही नियम सांगितले होते. बाळाला नेहमी हातात ठेवायचं, बाळ हातात असल्यावर शांत न बसता त्याला विविध गोष्टी सांगायच्या. याशिवाय फक्त मराठी भाषेतच बाळाशी संवाद साधायचा. टास्क दरम्यान अंकिताने बाळाशी मालवणी भाषेत संवाद साधला. यानंतर लगेच तिने वैभवला, “मालवणी भाषेत बोललं तर चालेल का?” असं देखील विचारलं. पण, वैभवने नियम मोडला म्हणून अंकिताच्या टीमची बीबी करन्सी कट केली. एवढंच नव्हे तर, “मालवणी ही मराठी भाषा नाही” असा अजब दावा अरबाज आणि वैभव यांनी केला आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा : Bigg Boss च्या घरात धक्काबुक्की! बाळांचे केले हाल…सगळेच झाले भावनाशून्य; कठोर शिक्षा होणार? पाहा प्रोमो

अरबाज आणि वैभव ( Bigg Boss Marathi ) यांच्या या मालवणी भाषेवर केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकरने देखील यावर आपलं मत मांडलं आहे.

अभिजीत केळकरची पोस्ट

अभिजीत केळकर म्हणतो, “कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत? हे लोक खरे परप्रांतीय आहेत ज्यांना मालवणी भाषा, मराठी भाषा वाटत नाही… हे स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात, ती भाषा आम्ही मराठी म्हणून चालवून घेतोच आहोत की… देवा महाराजा, ह्यांका Bigg Boss Marathi 5 च्या घरातून, हुसकून भायेर काड आनी “मालाडच्या मालवणीत” नेऊन सोड महाराज, व्हय महाराजा!” अशाप्रकारे पोस्ट शेअर करत अभिनेत्याने शेवटच्या ओळी मालवणी भाषेत लिहिल्या आहेत.

हेही वाचा : सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार? निर्मात्यांकडून विचारणा झाल्याचं आलं समोर

हेही वाचा : Video : श्रीदेवींच्या जयंतीनिमित्ताने लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंडसह नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

bigg boss
Bigg Boss Marathi : फोटो सौजन्य : कलर्स मराठी

दरम्यान, अनेक मालवणी लोकांनी अरबाज आणि वैभव यांनी माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे. तर, काही लोकांनी अंकिताला “तू बिनधास्त मालवणी बोल आम्ही तुझ्या पाठीशी आहोत” असं म्हटलं आहे.

Story img Loader