Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये अभिजीतच्या ‘बी’टीमने हुशारी दाखवल्यामुळे कोणालाही बीबी करन्सी जिंकता आली नाही. परिणामी दोन्ही गटांमध्ये टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
‘सत्याचा पंचनामा’मध्ये ( Bigg Boss Marathi) या टास्कमध्ये निक्कीच्या मताशी असहमती दर्शवल्याने ती संतापून पंढरीनाथ कांबळेला “तुम्ही ‘जोकर’ आहात” असं म्हणते. तर, निक्कीनंतर जान्हवीने देखील पॅडीच्या अभिनयाच्या करिअरवर भाष्य करत त्याचा अपमान केल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात पाहायला मिळालं. याबद्दल आता सोशल मीडियावर मराठी कलाकारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अभिनेता व ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) आधीच्या पर्वात सहभागी झालेला अभिनेता अभिजीत केळकरने याबद्दल पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
Bigg Boss Marathi : अभिजीत केळकरची पोस्ट
होय, आमचा पॅडी ‘जोकर’च आहे, कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा, Slapstickचा हुकमी एक्का, गायन आणि नृत्याच्याही राज्यात सहज मुशाफिरी करणारा हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेता. बऱ्या वाईट परिस्थितीतून, आयुष्यातल्या Ups आणि Downs मधून ताऊन सुलाखून निघालेला, पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि या सगळ्या वागण्या-बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस… म्हणजे पंढरीनाथ कांबळे! मित्रा, तुझ्या संयमाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादू की झप्पी…
मी आताच तुझी Finale ची AV बघतोय… या पालापाचोळ्याला तू तुझ्या हुशारीने कसं “छू” केलंयस त्यांचं त्यांनाही कळलं नाहीये. हा संयम ढळू देऊ नकोस आणि काहीही झालं तरी Nervous होऊ नकोस. तू आत भीड, आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोतच.
रितेश भाऊ आणि ‘कलर्स मराठी’, पॅडीबद्दल जे बोललं गेलंय ते ही अक्षम्यच आहे. पंढरीनाथ कांबळे आणि वर्षा ताईंनी माफ केलं असेल कदाचित पण आम्ही कधीच करणार नाही.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हे काम तुम्हाला बाप जन्मात…”, जान्हवीकडून पंढरीनाथचा अपमान! विशाखा सुभेदार संतापून म्हणाली, “शांत आहे याचा अर्थ…”
दरम्यान, अभिजीतच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे. मेघा धाडे, मेघना एरंडे यांनी कमेंट करत अभिजीतच्या मताला पाठिंबा दिला आहे.