Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता आठवा आठवडा सुरू झाला आहे. यावेळी घरावर ‘जंगलराज’ असणार आहे. यंदाच्या थीमनुसार घरात ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात ‘बिग बॉस’ने नॉमिनेशन टास्कमध्ये दोन ग्रुप केले होते. एकूण पाच फेऱ्यांमध्ये हा टास्क खेळण्यात आला. अखेर कार्याअंती निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज यांची सगळी टीम थेट नॉमिनेट झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात राहून सगळ्या सदस्यांना आता ५० हून अधिक दिवस झाले आहेत. त्यामुळे नेमकं कोण काय गेम खेळतंय याचा अंदाज प्रत्येकाला आला आहे. यावरूनच अभिजीतने या आठवड्यात अरबाज बाहेर जाईल असं भाकित केलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत, पॅडी व संग्राम यांच्यात अरबाजबद्दल चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. “अभिजीत आणि पॅडी म्हणत आहेत अरबाज आहे गुहेत पळून जाणारा सिंह” असं कॅप्शन वाहिनीने या प्रोमोला दिलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘जंगलराजमध्ये घरातील ५ सदस्य झाले नॉमिनेट! जान्हवीला अश्रू अनावर, तर निक्कीने…; नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi : अभिजीतने अरबाजबद्दल केलं भाकित

अभिजीत सावंत म्हणतो, “अरबाज बाहेर जाऊ शकतो यावेळेला…त्याचा आता गुलूगुलू करण्यात वेळ जातो. तो फक्त टास्कसाठी बाहेर येतो…नंतर टास्क झाला की, आपल्या गुहेत जातो. तो सिंह कसा असायचा…शिकारीला जात नाही, शिकार कोण करतं सगळ्या सिंहि‍णी करत असतात.”

Bigg Boss Marathi : अभिजीत सावंत – पॅडी कांबळे ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

पॅडी यावेळी म्हणतो, “त्याचा ( अरबाज ) अर्धा वेळ गुलूगुलू करण्यात जातो” तर, संग्रामने “अरबाज बाहेर गेला तर निक्की काय करणार” असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. आता अभिजीतने अरबाज घराबाहेर जाऊ शकतो हे केलेलं भाकित खरं ठरणार की खोटं हे या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “साडी नेसणारी पोरगी पाहिजे”, ‘बिग बॉस’ने मैत्रिणीबद्दल विचारताच सूरज चव्हाण लाजला! अभिजीत म्हणाला, “अरे…”

हेही वाचा : निक्कीला मारल्याने Bigg Boss Marathi मधून बाहेर पडलेली आर्या अमरावतीला कधी जाणार? तिनेच सांगितली तारीख

दरम्यान, यापूर्वी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा अरबाजला ‘निक्कीचा डोअरमॅट’ असं म्हटलं होतं. त्यामुळे एकंदर टास्क सोडला, तर कोणालाचा निक्कीमुळे अरबाजचा गेम दिसत नाहीये. याशिवाय जान्हवीने देखील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात वैभव, घन:श्याम हे सदस्य घराबाहेर होण्यासाठी निक्की-अरबाजला जबाबदार ठरवलं आहे. तसेच, या दोघांमुळेच आमच्या टीममधले खूप जण बाहेर गेले असा आरोप जान्हवीने यावेळी केल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi abhijeet predicted arbaz elimination watch new promo sva 00