Bigg Boss Marathi Family Week : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाचा सीझन ७० दिवसांमध्ये संपणार याची अधिकृत घोषणा झाल्यावर घरात ‘फॅमिली वीक’ होणार की नाही याबद्दल नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. अखेर ‘बिग बॉस’च्या घरात हा बहुप्रतिक्षीत ‘फॅमिली वीक’ टास्क सुरू झालेला आहे.

दरवर्षी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांचे कुटुंबीय या ‘फॅमिली वीक टास्क’मध्ये घरात एन्ट्री घेतात. अभिजीतची पत्नी शिल्पाने बुधवारी रात्री लेकीचा फोटो शेअर करत त्यावर “भेट झाल्यावर हिचा चेहरा बघा” असं कॅप्शन दिलं होतं. हा फोटो पाहताच क्षणी ‘बिग बॉस’च्या घरात ‘फॅमिली वीक’ सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ‘बिग बॉस’च्या टीमने यासंदर्भातील पहिली प्रोमो शेअर करत सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की पुन्हा रडली! ‘ती’ एक चूक पडली महागात, टास्कमध्ये कमावली फक्त ‘इतकी’ रक्कम, नेमकं काय घडलं?

बिग बॉस’च्या घरात सुरू होणार Family Week

‘कलर्स मराठी वाहिनी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’मध्ये ‘फॅमिली वीक’ टास्क सुरू झाल्याचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या पहिल्या प्रोमोमध्ये अभिजीत सावंतच्या पत्नीने घरात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून पत्नीला आत येताना पाहून गायक प्रचंड भावुक होतो. यानंतर घरात येतात अभिजीतच्या दोन गोंडस मुली… आपल्या बाबाला जवळपास दोन महिन्यांनी पाहिल्यावर त्याच्या दोन्ही मुली प्रचंड भावुक झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi Family Week
Bigg Boss Marathi Family Week : घरात आले अभिजीत सावंतचे कुटुंबीय

अभिजीतची लेक अंकिताबरोबर गार्डन परिसरात बसलेली असते तेव्हा ती Bigg Boss कडे गोड विनंती करत म्हणते, “बिग बॉस’ मी इथे राहू शकते का?” यावर ‘बिग बॉस’ म्हणतात, “चला अजून एक वाइल्ड कार्ड स्पर्धक मिळाला.” यानंतर संपूर्ण घरात एकच हशा पिकतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”

दरम्यान, सध्या या भावनिक प्रोमोवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे. ‘बिग बॉस’मध्ये ‘फॅमिली वीक’ सुरू झाल्याचं पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यामुळे आता कुटुंबीय येऊन घरातील सदस्यांना काय सल्ला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader