Bigg Boss Marathi Family Week Task : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बहुप्रतिक्षीत ‘फॅमिली वीक’ टास्कला आता सुरुवात झालेली आहे. यानिमित्ताने अभिजीत सावंतच्या कुटुंबीयांना घरात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. गायकाची पत्नी शिल्पा आणि त्याच्या दोन मुली आहाना आणि स्मिरा ‘बिग बॉस’च्या घरात आल्या होत्या. याचा प्रोमो ‘कलर्स मराठी’कडून शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवळपास दोन महिन्यांनी आपल्या कुटुंबाला पाहिल्यावर अभिजीत प्रचंड भावुक झाला होता. पत्नीला मुख्यद्वारातून घरात प्रवेश घेताना पाहूनच त्याला अश्रू अनावर झाले होते. यानंतर गायकाच्या दोन्ही मुलींनी धावत येऊन लाडक्या बाबाची भेट घेतली. यावेळी गार्डन परिसरात सगळेजण एकत्र बसून गप्पा मारत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – अखेर ‘तो’ क्षण आलाच! पत्नी व मुलींना पाहून अभिजीत झाला भावुक, गायकाच्या लेकीची Bigg Boss ला गोड विनंती, म्हणाली…

अभिजीत सावंतच्या पत्नीची पोस्ट

अभिजीत व त्याच्या कुटुंबीयांच्या भेटीचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पतीची भेट घेऊन घराबाहेर आल्यावर शिल्पाने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय ‘बिग बॉस’च्या घरात बोलावल्याबद्दल शिल्पाने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

अभिजीत सावंतची पत्नी लिहिते, “सर्वात आधी आम्हाला ‘बिग बॉस मराठी’मध्ये बोलावल्याबद्दल ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार! इतक्या दिवसांनंतर अभिजीतला बघून खूपच छान वाटलं. आम्हाला भेटल्यावर तो आता अजून स्ट्राँगली गेम खेळेल हे नक्की! तो खूप जास्त स्ट्राँग माणूस आहे. आजचा फॅमिली स्पेशल एपिसोड बघायला विसरू नका आणि आपल्या अभिजीतला भरभरून व्होट्स करा!”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की पुन्हा रडली! ‘ती’ एक चूक पडली महागात, टास्कमध्ये कमावली फक्त ‘इतकी’ रक्कम, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi : अभिजीत सावंतच्या पत्नीची पोस्ट

हेही वाचा : Bigg Boss Marathi – २ महिन्यांनी बाबाला भेटली अन् घरी परतताना अभिजीत सावंतची लेक झाली नाराज! पत्नी ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील हा ‘फॅमिली वीक’ टास्क पाहण्यासाठी सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सदस्यांचे कुटुंबीय घरात एन्ट्री घेतल्यावर त्यांना खेळाविषयी काय सल्ला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi abhijeet sawant wife shilpa first post after she visit bb house and meet husband sva 00