मराठी बिगबॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता शिव ठाकरे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. मराठी बिग बॉसनंतर शिव ‘रोडिज’ आणि नंतर हिंदी ‘बिग बॉस १६’, ‘खतरों के खिलाडी १३’ झळकला. शिव ठाकरेने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नुकतंच शिवने एका चाहत्याची जाहीर माफी मागितली आहे.

शिव ठाकरेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी एका चाहत्याने शिव ठाकरेच्या पोस्टवर कमेंट केली. “शिव दादा मी तिथेच राहतो. मी तुम्हाला एक सेल्फी द्या, असे बोललो. पण तुम्ही नाही दिलात. मी रोडीजमध्ये तुझी मुलाखत पाहिली तेव्हापासून तुझा खूप मोठा चाहता आहे. मी तुला किती हाक मारली, पण तू मला अपसेट केलं यार”, अशी कमेंट एकाने केली आहे.
आणखी वाचा : “माझ्या वयाची मुलं लग्न करतात आणि मी…”, ‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल छिदमच्या पोस्टने वेधलं लक्ष

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Dombivli Raj Thackeray meeting, Raj Thackeray,
डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे
aditya thackeray criticized raj thackeray
“भाजपाचा मुख्यमंत्री बसावा असं स्वप्न बघणारे…”; आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
Raj Thackeray refused to visit sada Sarvankar
राज ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट नाकारली
raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
Raj Thackeray kalyan Rural
Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा

यावर शिव ठाकरेने कमेंट केली आहे. “भाई, मला माफ कर यार. गर्दीमुळे शक्य झालं नाही. पण मी प्रॉमिस करतो आपण भेटून नक्की सेल्फी घेऊ”, असे शिव ठाकरेने म्हटले आहे.

yuvraj pachpute shiv thakery comment
शिव ठाकरेची कमेंट

दरम्यान शिव ठाकरे हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. नुकतंच त्याने लालबाग राजाच्या दर्शनाबद्दल भाष्य केले. “मुंबईचा राजा, लालबागचा राजा हे प्रत्येक माणसाला माहिती असलेलं नाव आहे. देशभरातून लोक बाप्पाच्या दर्शनाला इथे येत असतात. मला रांगेत उभं न ठेवता थेट मूर्तीपर्यंत नेतात हे मला चांगलं वाटतं. पण जे लोक काही तास रांगेत थांबले आहेत ते माझ्याकडे बघून म्हणत असतील की, आम्ही थांबलोय इथे रांगेत आणि तू आधी गेलास. त्यामुळे त्याबद्दल सगळ्यांना खरंच सॉरी.” असे शिव ठाकरेने म्हटले.

आणखी वाचा : शिव ठाकरेला VIP रांगेतून लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याची खंत, म्हणाला, “जे लोक काही तास रांगेत थांबलेले असतात…”

पुढे तो म्हणाला, “पण मला खरंच रांगेत उभं रहायला आवडेल. सेलिब्रिटींची तिथे एक वेगळी रांग असायला हवी जेणेकरून आम्हालाही बाप्पाच्या दर्शनासाठी स्वतःहून काहीतरी प्रयत्न करावे लागतील. पण मला व्हीआयपी रांगेतून दर्शन घेतल्याचं थोडं गिल्ट वाटत आहे. पण मला या सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचा खूप कौतुक वाटतं की एवढ्या सगळ्या लोकांची ते दिवसभर खूप चांगली व्यवस्था करतात.” त्यामुळे आता शिव ठाकरेच हे बोलणं चर्चेत आलं आहे.