मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेत असते. रुचिराला फिटनेसची प्रचंड आवड आहे. नुकतंच तिने तिच्या हातावर टॅटू काढण्यामागचे कारण सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुचिरा जाधवने ‘मीडिया टॉक ऑफिशिअल’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या हातावरील टॅटूचा अर्थ विचारण्यात आला. त्यावेळी तिने हे काढण्यामागचे कारण सांगितले आहे.
आणखी वाचा : मिलिंद गवळींनी चाखली सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमधील पदार्थांची चव, म्हणाले “त्याने अतिशय…”

“माझ्या शरीरावर फक्त एकमेव टॅटू आहे. मला टॅटू काढायला अजिबात आवडत नाहीत. कारण मला असं वाटतं की आपल्याला देवाने जसं घडवलंय, त्याच्याबरोबर आपण छेडछाड करतो, असं मी समजते.

पण हा टॅटू काढण्यामागचं कारण म्हणजे मी थिएटर केलं आहे. कॉलेजमध्ये थिएटर करत असताना माझ्या अभिनयाची सुरुवात झाली. त्यामुळे मला माझ्या करिअरला समर्पित करण्यासाठी मी हा टॅटू काढला”, असे रुचिराने सांगितले.

“मी जेव्हा माझे हात जोडते तेव्हा या दोन्हीही मुद्रा एकत्र येतात. यातील एक हास्यमुद्रा आणि दुसरी रौद्रमुद्रा आहे. मी जेव्हा हा टॅटू काढला तेव्हा मला खूप दुखलं. हा टॅटू काढण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. पण मला हा टॅटू काढण्यासाठी जवळपास साडे तीन तास लागले”, असेही तिने म्हटले.

आणखी वाचा : “हिंदीत काम करण्याचा अनुभव कसा आहे?” चिन्मय मांडलेकरने सांगितला फरक, म्हणाला “मराठी सिनेसृष्टीत…”

दरम्यान रुचिरा जाधवने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती. ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही ती झळकली. मालिकांशिवाय रुचिरानं नाटक आणि चित्रपटातही काम केलं आहे.