बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. शिव ठाकरेने बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकले होते. या पर्वानंतर आता शिव हा बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला आहे. या कार्यक्रमाद्वारे त्याने सर्व हिंदी रसिकांची मनं जिंकण्यास सुरुवात केली आहे. सध्या तो चांगलाच चर्चेत आहे. शिव हा हिंदी बिग बॉस सीझन १६ मध्ये सहभागी झाला आहे. यावेळी त्याने सर्व प्रेक्षकांची पहिल्या दिवसापासूनच मनं जिंकण्यास सुरुवात केली आहे. मात्र एकदा एका मुलाखतीत शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री वीणा जगतापने तो खोटारडा आहे, असा आरोप केला होता. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

बिग बॉस या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगतापकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठी २ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलाच गाजला. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले होते. विशेष म्हणजे वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही हातावर गोंदवून घेतला होता. तसेच शिव बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर तिने जंगी सेलिब्रेशनही केले होते. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा ब्रेकअप झाला. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्या दोघांनी एकत्र अनेक मुलाखती दिल्या. यातील एका मुलाखतीत वीणा जगतापने शिव खोटारडा आहे, असे म्हटले होते.
आणखी वाचा : “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

कलर्स मराठी या वाहिनीवरील दोन स्पेशल या मुलाखतीदरम्यान शिव-वीणा यांनी हजेरी लावली होती. बिग बॉस मराठीतून प्रसिद्धीझोतात आलेल्या या जोडप्याला यावेळी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. अभिनेता जितेंद्र जोशीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. यावेळी त्याने शिव आणि वीणाला त्या दोघांबद्दल प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर त्यांना लिहायला सांगितली. यावेळी जितेंद्र जोशीने शिव आणि वीणाला शिवची रास कोणती हे लिहिण्यास सांगितले. त्यावेळी शिवने काहीही लिहिले नाही. तर वीणाने त्यावर कन्या असे लिहिले. त्यानंतर शिवचा आवडता रंग असा प्रश्न विचारला असता शिवने लाल आणि वीणाने काळा असे लिहिले.

यानंतर जितेंद्र जोशींनी त्या दोघांना वीणाचा आवडता हिंदी अभिनेता कोणता असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिवने सलमान खान असे लिहिले. तर वीणाने मला अक्षय कुमार असे लिहिले. त्यावर शिव म्हणाला तू कधी सलमान म्हणतेस. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या वेळी सलमान म्हटलं होतंस. त्यानंतर वीणा म्हणाली नाही मी तुला मिस्टर अँड मिसेस खिलाडी अक्षय कुमार असे सांगितले होते. तू खोटारडा आहेस, असे वीणाने गमतीत म्हटले. मात्र त्यांच्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

दरम्यान सध्या शिव हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात सदस्य म्हणून सहभागी झाला आहे. शिव ठाकरे बिग बॉस हिंदीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सलमान खानने त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर शिव ठाकरे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असल्याचे पाहायला मिळत होते. तर वीणा ही अनेक मालिकांमध्ये झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader