‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून अक्षय केळकरला ओळखले जाते. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा तो विजेता ठरला. सध्या तो ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. नुकतंच या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता धोंगडेने हजेरी लावली. त्यावेळी त्याने अमृतासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या अंतिम पाच स्पर्धकांमध्ये अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत उरले होते. या पर्वात अक्षय केळकर हा विजेता ठरला. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओत अक्षय केळकर आणि अमृता धोंगडे रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

अक्षय केळकरची पोस्ट

“Bigg Boss house मध्ये पहिल्या दिवशी प्रत्येकाच्या हाताला एक band बांधून आत पाठवलेलं. त्यात घरातल्या कामाचं division होतं. घरात आल्या नंतर थोड्या वेळाने माझ्या हातावरचा तो band पडला. आणि तू तो उचलून लपवलास. पुढे बराच वेळ तो शोधण्यात घालवावा लागला… !!!!

तर, असं आल्या आल्या पहिल्याच दिवसापासून तू जो काही मला त्रास देते आहेस… तो आज पर्यंत continue झालेला आहे! एकतर तू B टीम मधली! त्यामुळे आपण भांडणं हे by default होणारच होतं! पण task पलीकडे, B टीम च्या काही जणांसोबत घरात असल्यापासूनच माझी चांगली मैत्री झाली, आणि त्यात तू एक आहेस याचा मला आनंद आहे!

पण आज ची ही post खास Ticket to Finale task साठी आहे! त्या task मध्ये अपूर्वा माझी प्रतिस्पर्धी होती, आणि मला घरातील सदस्यांपैकी female partner माझ्यासाठी खेळायला निवडायचा होता. त्या वेळी घरात तू आणि राखी दोघीच होतात. राखीला stiches होते, त्यामुळे तिने खेळणं impossible होतं. आणि… It was your shark week!

पण, तुला विचारणं क्रमप्राप्त च होतं कारण तो task चा भाग होता आणि तुला त्रास होतोय paining होतंय हे माहीत होत! But here comes the Dhakkad Girl! तू लगेच हो म्हणालीस यार…. आणि त्या अवस्थेतही तू जे जीव तोडून खेळलीस माझ्यासाठी… माझ्यासाठी आपण तिथे जिंकलो होतो. Thank you so much dhongdeeeeee!!!!! आणि, thank you so much for being my amazing dance partner this season! बाकी मी शिकवलं तशीच नाचलीस! धन्यवाद! कळावे! लोभ असावा!”, असे अक्षय केळकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मी ट्रेनमध्ये ड्रेस मटेरिअल विकायचे”, विशाखा सुभेदार यांचा खुलासा, म्हणाल्या “माझा नवरा…”

दरम्यान अक्षय केळकरने केलेल्या या पोस्टवर अमृता धोंगडेनेही कमेंट केली आहे. तिने यावर कमाल असे म्हटले आहे. तर अक्षयच्या अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. काहींना यावर हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi akshay kelkar special post for amruta dhongde share romantic dance video nrp