Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात नवव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा खेळ एकूण शंभर दिवसांचा असतो. मात्र, ‘बिग बॉस’ने घरात केलेल्या घोषणेमुळे आता हा खेळ शंभर नव्हे तर ७० दिवसांमध्ये संपणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे.

‘बिग बॉस’चं ( Bigg Boss Marathi ) पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत ‘बिग बॉस’कडून घरातील सदस्यांसमोर अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली आहे.

यंदा २८ जुलैला घरात एकूण १६ सदस्यांनी प्रवेश घेतला होता. यानंतर वाइल्ड कार्ड म्हणून संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री झाली. म्हणजेच यंदाच्या पाचव्या पर्वात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी ९ सदस्यांनी आतापर्यंत घराचा निरोप घेतला आहे. तर, उर्वरित आठ जणांमध्ये आता ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत होणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : १०० नव्हे तर फक्त ७० दिवसांत संपणार पाचवा सीझन! ‘या’ दिवशी असेल ग्रँड फिनाले, जाणून घ्या…

‘बिग बॉस’ने ७० दिवसांमध्ये यंदाचा सीझन संपणार अशी घोषणा करताच घरातल्या सगळ्याच सदस्यांना धक्का बसल्याचं पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’मराठीच्या महाअंतिम फेरीला आता फक्त काही दिवस उरले आहेत. तत्पूर्वी घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, यंदा ‘बिग बॉस’ने कोणताही नॉमिनेशन टास्क न घेता सगळ्या आठ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे.

आता महाअंतिम सोहळा जवळ आल्याने सगळ्या सदस्यांना नॉमिनेट करण्याचा निर्णय ‘बिग बॉस’कडून घेण्यात आला आहे. घरातील सगळे आठ सदस्य नॉमिनेट झाल्याने ‘बिग बॉस’ने एक खास टास्क या सदस्यांना दोन ग्रुपकरून दिला आहे. यात विरुद्ध गटातील कोणत्याही दोन सदस्यांना टार्गेट करायचं होतं. घरात ज्या दोन सदस्यांना ठामपणे आपली मतं मांडता येत नाहीत. अशा सदस्यांना टार्गेट करून त्यांच्या चेहऱ्यावर फुली मारायची आहे. जेणेकरून व्होटिंग करताना प्रेक्षक या सगळ्या निकषांचा विचार करतील असं ‘बिग बॉस’कडून सांगण्यात आलं.

Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Video : अंकिताने पुन्हा केलं सूरजला Target! ‘तो’ प्रोमो पाहून नेटकरी नाराज; तर निक्की म्हणाली, “भाऊ-भाऊ बोलून गळा…”

Bigg Boss Marathi- बिग बॉसने तयार केल्या दोन टीम

टीम A – निक्की, अभिजीत, सूरज, वर्षा

टीम B- जान्हवी, अंकिता, पंढरीनाथ, धनंजय

दरम्यान, या दोन्ही टीममधल्या सदस्यांना आपल्या विरुद्ध टीममधील दोन सदस्यांना टार्गेट करून संबंधितांच्या चेहऱ्यावर फुली मारायची होती. या टास्कमध्ये ठामपणे मत मांडता न येणाऱ्या सदस्यांमध्ये सूरजचं नाव घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी अंकिता वालावलकरला ट्रोल केलं आहे. तर, अंकिताच्या स्पष्टवक्तेपणाचं अनेकांनी कौतुक देखील केलं आहे.