Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात संपूर्ण समीकरण बदललं आहे. पहिल्या दिवसापासून अरबाज, निक्की, जान्हवी आणि वैभव एकत्र खेळत होते. परंतु, भाऊच्या धक्क्यावर निक्कीने तिच्याविरोधात काय-काय बोललं जातंय हे पाहिल्यावर ‘ए’ ग्रुपमधून एक्झिट घेतली. निक्कीने ग्रुप सोडल्यापासून आता ही मित्रमंडळी आपआपसांत भांडू लागली आहेत. अशातच अरबाजला निक्की-अभिजीतची मैत्री खटकल्याने घरात नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

‘बिग बॉस मराठी’ने या आठवड्यात घरात एकूण ६ जोड्या बनवल्या आहेत. आता हा संपूर्ण आठवडा सदस्यांना आपल्या जोडीदाराबरोबर राहून प्रत्येक टास्क पूर्ण करणं भाग आहे. निक्की व अभिजीतची जोडी असल्याने आता प्रत्येक गोष्टीत दोघांना एकमेकांवर अवलंबून राहावं लागत आहे. त्यामुळे अरबाजला हे काहीच रुचत नाहीये. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अरबाज निक्की-अभिजीतवर भयंकर संतापल्याचं पाहायला मिळालं.

Father dance for his daughter on wedding day heart touching Video
“मेरी दुनिया तू ही रे” लेकीच्या लग्नात वडिलांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यांत येईल पाणी
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
tv serial actress arrested for kidnapping 4 year child in vasai zws
अपहृत चिमुकल्याची ४ तासात सुखरूप सुटका; टिव्ही मालिकेतील अभिनेत्रीला अटक
swara bhasker fahad ahmad trolled
स्वरा भास्करच्या नवऱ्यानं सुप्रिया सुळेंसाठी छत्री धरली; सोशल मीडियावर नवरा-बायको दोघंही ट्रोल
ghaziabad maid mixes urine in food
Ghaziabad Maid: “..म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती
Rishabh Pant Cryptic Midnight IPL Auction Post Goes Viral Will He Quite Delhi Capitals Asks Will I Be sold or Not
Rishabh Pant: ऋषभ पंतने सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली कॅपिटल्सला दिला धक्का, चाहत्यांना प्रश्न विचारत टाकलं संभ्रमात
Ratan Tata Passed Away Ratan Tata Death Harsha goenka Sundar Pichai Tribute tweet
Ratan Tata Death: “घड्याळाची टिकटीक थांबली…” हर्ष गोयंका यांची मन हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’
Big Finance Company Manger Suicide
Suicide : बड्या फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या, कामाचा ताण, काढून टाकण्याच्या धमक्यांमुळे उचललं पाऊल

हेही वाचा : Bigg Boss Marathi Video : भुसXX, लायकी…; निक्कीची जीभ पुन्हा घसरली, ‘तो’ प्रोमो पाहून मराठी अभिनेता संतापला; म्हणाला, “ही भाषा…”

अरबाजची सुरुवातीला अभिजीतबरोबर शा‍ब्दिक बाचाबाची झाली. यानंतर किचन एरियामध्ये निक्कीने अरबाजला “बोलत का नाहीस?” याबद्दल जाब विचारला. पुढे, दोघांमध्ये वाद होऊन अरबाजने किचनमध्ये भांडी फोडली. निक्कीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण, अरबाजने कोणाचंही ऐकलं नाही. बेडरुममध्ये देखील अरबाजने आदळआपट केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी घरातले सर्व सदस्य त्याला शांत करण्यासाठी गेले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून आता अरबाजची कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. परंतु, निक्की – अरबाजमधली भांडणं कायम आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi : घरातल्यांनी घेतली निक्की-अरबाजची फिरकी

निक्की-अरबाजच्या भांडणांची फिरकी घेण्यासाठी घरातील सगळे सदस्य एकत्र जमून विरहाची गाणी गात असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. “ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी”, “हो मुझे छोड़ कर जो तुम जाओगे … बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे” ही गाणी घरातले सगळे सदस्य एकत्र बसून आजच्या भागात गाणार आहेत. यावेळी अरबाज – निक्की देखील हसत होते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरात तोडफोड केल्यावर ‘बिग बॉस’ने अरबाजला दिली मोठी शिक्षा! निक्कीची ‘ती’ कृती ठरली कारणीभूत

नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा फक्त गेम असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. “बाईई… तुम्ही पागल झालाता का”, “टीम B तुम्हाला हा गेम कळत नाहीये का?”, “बिग बॉस तुम्हाला फक्त A टीम फोडायला सांगितलं होतं. अख्ख घर नाही” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.