‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रसिद्धी झोतात आली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अंकिता जबरदस्त खेळताना दिसली. त्यामुळे अंकिता टॉप-५पर्यंत पोहोचली. ‘बिग बॉस’च्या घरातला तिचा खेळ अनेकांना आवडला. आता लवकरच ही कोकण कन्या लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या अंकिता लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहे. नुकतंच तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अंकिता वालावलकरने सर्वात आधी लग्नाची बातमी राज ठाकरेंनाच सांगितली होती. एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने सांगितलं होतं की, तुम्ही सर्वांनी ‘बिग बॉस’च्या घरातील माझा प्रवास पाहिला. मी खूप जास्त भावनिक मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न ठरत होतं तेव्हा एक गोष्ट तुम्हाला सांगते. आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात, त्यापैकीच एक गुण जुळला तो म्हणजे आमच्या भावना. त्या भावनांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे. जेव्हा ‘येक नंबर’ या चित्रपटाचं काम चालू होतं आणि कुणाल या चित्रपटासाठी काम करत होता. तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. यादरम्यानच आम्ही राज ठाकरेंना सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी सांगितली होती. राज साहेबांना आम्ही गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण, त्यानंतर ‘बिग बॉस’मुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या.

आता नुकतीच अंकिता होणारा पती कुणाल भगतसह राज ठाकरेंचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर गेली होती. यावेळी तिने लग्नाची पत्रिका देत राज यांना निमंत्रण दिलं. अंकिताने निमंत्रण देतानाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. यामध्ये राज ठाकरेंसह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील पाहायला मिळत आहे.

अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम स्टोरी
अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, अंकिता वालावलकरने लग्नाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण माहितीनुसार, अंकिता मार्च महिन्यात कुणालबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. अंकिताचा होणारा पती कुणाल संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्याने संगीतबद्ध केलं आहे.

Story img Loader