Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आजपासून नवव्या आठवड्याची सुरुवात होणार आहे. यंदाच्या पाचव्या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्रीसह एकूण १७ स्पर्धकांनी प्रवेश घेतला होता. यापैकी आता घरात एकूण ८ सदस्य आहेत. आता या ८ जणांमध्ये ‘बिग बॉस’ची अंतिम ट्रॉफी जिंकण्यासाठी रंगतदार लढत होणार आहे.

‘बिग बॉस’च्या घरातून नुकतीच अरबाज पटेलने एक्झिट घेतली. आपण एवढ्या लवकर घराच्या बाहेर जाऊ असा विचार देखील अरबाजने केला नव्हता. त्यामुळे हे एलिमिनेशन सर्वात मोठा धक्का असल्याचं देखील अरबाजने मान्य केलं आहे. आता अरबाज घराबाहेर गेल्यावर निक्की तिचा गेम कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “Unfair झालं”, ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “मी स्वतःला विजेता…”

अंकितावर नेटकरी नाराज

अरबाज आणि निक्की शोमध्ये पहिल्या दिवसापासून एकत्र होते. घरात एकत्र प्रवेश घेतल्यावर पुढे निक्की, जान्हवी, वैभव आणि अरबाज या चार जणांना मिळून एक ग्रुप तयार झाला. मात्र, कालांतराने त्यांचा हा ग्रुप फुटला. पण, ग्रुप जरी फुटला असला तरी, काही दिवसांनी अरबाज-निक्की एकत्र खेळू लागले. मात्र, आता अरबाज घराबाहेर गेल्यावर निक्की पूर्णपणे बिथरल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस’कडून घरातील सदस्यांना एक नवीन टास्क देण्यात आला आहे.

‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना एकमेकांन टार्गेट करण्याचा नवीन टास्क दिला आहे. यामध्ये घरात ठामपणे आपलं मत न मांडणाऱ्या दोन सदस्यांची नावं घ्यायची होती. यावेळी पुन्हा एकदा अंकिताने सूरजचं नाव घेतलं आहे. ‘बिग बॉस’चा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी अंकिताच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. याच ‘टार्गेट’ टास्कमधून या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : “ही राणी आता…”, अरबाज घराबाहेर गेल्यावर निक्कीची रडून झालीये ‘अशी’ अवस्था; ‘बिग बॉस’ने शेअर केला भावुक प्रोमो

हेही वाचा : पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘तुंबाड’ची जबरदस्त कमाई, पण दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन करणार नाही राही अनिल बर्वे; स्वतः सांगितलं कारण

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अंकिताने ठाम मत मांडता न येणाऱ्या दोन सदस्यांमध्ये सूरजचं नावं घेतल्यामुळे निक्की पटकन म्हणते, “बघ…भाऊ-भाऊ बोलून तुझा गळा पकडायचाय” याशिवाय नेटकऱ्यांनी देखील अंकिताच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.